आज पुन्हा फटका…पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ…

महागाईच्या आघाडीवर आज पुन्हा सामान्य लोकांना मोठा झटका बसला आहे. एका दिवसाच्या आरामानंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 35 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेल प्रतिलिटर 17 पैशांनी महागला आहे. यापूर्वी मंगळवार, 6 जुलै रोजी तेलाच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झाली नव्हती.

यामुळे दिल्ली आणि कोलकातासारख्या महानगरांमध्येही पेट्रोल आज 100 रुपयांच्या वर गेले आहे. या वाढीमुळे दिल्लीत आज पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100.21 रुपये आणि डिझेल 89.53 रुपये प्रतिलिटर आहेत. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोलची किंमत 106.25 रुपये तर डिझेल प्रति लिटर 97.09 रुपये आहे. कोलकातामध्ये आज पेट्रोल 100.23 रुपये आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल 101.06 रुपये तर डिझेल 94.06 रुपये प्रतिलिटरवर पोचले आहे.

पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर गेल्या 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. या काळात पेट्रोलच्या किंमतीत आतापर्यंत 37 वेळा वाढ करण्यात आली आहे. या 37 दिवसात पेट्रोल 9.89. रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर आतापर्यंत डिझेलमध्ये 35 वेळा वाढ झाली आहे. या 35 दिवसांत डिझेल 8.47 रुपये प्रति लीटर महाग झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here