पेट्रोल,डीझेल ची दरवाढ आज ही…सलग विसाव्या दिवशीही दरवाढ…

डेस्क न्यूज – गेल्या २० दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचं सत्र सुरूच आहे ते थांबायचं नावच घेत नाहीये ,कॉंग्रेस ची जेव्हा सत्ता असतांना पेट्रोल,डीझेल दरवाढीसाठी भाजपा रस्त्यावर उतरली होती त्यावेळी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते मात्र आज भाजपची सत्ता आहे, विपक्ष पाहिजे तेवढा विरोध करीत नाही त्यामुळे दरवाढ अशीच सुरु राहणार का? असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.

दरम्यान, आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात २१ पैशांची तर डिझेलच्या दरात १७ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ८०.१३ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.१९ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. गुरूवारी पहिल्यांदाच डिझेलच्या दरानं ८० रूपयांचा टप्पा पार केला होता.

शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग विसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यानंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८६.९१ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.५१ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

तर चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८३.३७ रूपये प्रति लिटर आणि ७७.४४ रूपये, तर कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ८१.८२ रूपये प्रति लिटर आणि ७५.३४ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर ८२.७४ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७६.२५ रूपये प्रति लिटरवर गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here