रेल्वे इंजिन खाली आलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला असे मिळालं जीवदान…कल्याण स्थानकावरील घटना…पहा व्हिडिओ

न्यूज डेस्क – कल्याण रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडणाऱ्या एका वृद्धास लोको पायलटने वेळीच ब्रेक मारल्यानं वयोवृद्ध नागरिकाला नवा जन्म मिळाला. कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.

मुंबई-वाराणसी एक्स्प्रेससमोर एक वयोवद्ध व्यक्ती आली. मात्र, लोको पायलटने वेळीच प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला. रेल्वे इंजिन खाली अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकाला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं.

या घटनेचा व्हिडीओ मध्य रेल्वेनं सोशल मीडियावर शेअर करत रुळ न ओलांडण्याचं आवाहन केलं आहे. प्रसंगावधान दाखल्याबद्दल लोको पायलटसह इतर अधिकाऱ्यांना २००० हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here