बुलढाणा – अभिमान शिरसाट
उत्तर प्रदेश येथील हाथरस पिडीता असहाय्य मुलीवर चार नराधमांनी बलात्कार करून तिचा अमाणूस आणि निर्दयपणे खून केला त्या चारही नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बुलढाणा येथील लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या वतीने माननीय पंतप्रधान तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचेमार्फत करण्यात आली.

यावेळी लोककलावंत सांस्कृतिक मंच चे प्रदेश उपाध्यक्ष शाहीर डीआर इंगळे जिल्हाध्यक्ष शाहीर शिवाजी लहाने अशोक क्षीरसागर दादाराव वानखेडे प्रल्हाद गवई चंपालाल महाराज शिवाजी लहाने रामदास मलवार केसरबाई इंगळे संजय निकाळजे यांच्यासह जिल्ह्यातील लोककलावंत सांकृतिक मंच चे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थितीत होते.