पवना धरण ओव्हर फ्लो…पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

न्यूज डेस्क – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण १००% भरले असून धरणाच्या सांडव्यातून २२०० क्युसेक ने विसर्ग सुरू आहे, धरणातुन सकाळी १०.०० वाजता २२०० क्युसेस ने विसर्ग साेडण्यात आलेला आहे. नदी तिरावरील नागरीकांनी सतर्क रहावे असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

पवना धरण पाणलोट क्षेत्रात मागील २४ तासात चांगला दमदार पाऊस झाल्याने धरण १००% टक्के भरल्याने जवळपास ओव्हर फ्लो झाले असून नदी पात्रात २ हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडकरांना गतवर्षी पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तरी पाणी कपातीचा निर्णय महानगर पालिका मागे घेते का? हे बघावे लागणार आहे.

पवना धरण पाणलोट क्षेत्रात महिनाभरापासून समाधानकारक पाऊस झाला असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस कमीच मानला जात आहे. यावर्षी १ जून ते ३०ऑगस्ट पर्यंत १ हजार ५४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गतवर्षी याच कालावधीत ३ हजार १५४ मिलिमीटर पावसाची नोंद होती. या आकडेवारीवरून यावर्षीचा मावळ परिसरातील पाऊस फारच कमी असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासात धरणाच्या पाणी साठ्यात ३.५६ टक्के वाढ झाली आहे. तर १ जून पासून आजतागायत ६२.७१ टक्के धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here