मातिकाम पुर्ण पांदण रस्त्यांचे खडीकरण करा,शेतक यांची मागणी…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अकुशल कामान्तर्गत पान्दण रस्त्यांचे मातिकाम पुर्ण झाले.मात्र या योजनेच्या कामाला 10 वर्षाहून अधिक काळ लोटूनही शेतक-यांना शेतिकामासाठी पावसाळ्यात चिखल माती तुडवित ये-जा करावे लागत असल्याने मातीकाम पूर्ण पांदन रस्त्याचे खडीकरण करा अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार शासनाच्या मग्रारोहयो अंतर्गत लाखांदूर तालुक्यात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात पांदन रस्त्याचे मातीकाम करण्यात आले. सदरचे मातीकाम पूर्ण होऊन दहा वर्षापेक्षा अधिक काळ देखील झाला आहे.

मात्र मातीकाम पूर्ण पांदण रस्त्यावर अध्यापक खडीकरण करण्यात आले नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती कामासाठी विविध शेती उपयोगी अवजारे निविष्ठा यासह अनेक कामे करताना पावसाळ्याच्या दिवसात तब्बल गुडघाभर चिखलातून ये-जा करावी लागत आहे.

नियमित शेतीकामासाठी गुडघाभर चिखलातून ये-जा करावी लागत असल्याने खडीकरणा अभावी पांदण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेतकरी शेतमजुरांना अनेक त्रास सहन करावे लागत असल्याची ओरड आहे.

दरम्यान लाखांदूर तालुक्यातील चप्राड पहाडीवर वीस वर्षापूर्वी रोहयोअंतर्गत हाताने फोडण्यात आलेल्या गिट्टी बोल्डर निरुपयोगी ठरत असल्याने सबंधित गिट्टी बोल्डरचा वापर मातीकाम पूर्ण पाणंद रस्त्यांच्या खरी करण्यासाठी करण्यात यावा तसेच सदर कामासाठी शासनासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here