पातुर चे होमगार्ड सैनिक सन्मानित…

पातुर – निशांत गवई

कोरोणा महामारीचे थैमान संपूर्ण जगात पसरले असल्याने शासनाच्या वतीने कोविड 19 बंदोबस्त महाराष्ट्र भर तैनात करण्यात आला आहे.त्या अनुशंगाने पोलिसाच्या खांद्याला खांदा लावुन होमगार्ड सैनिक ड्युटी बजावत आहेत.

अकोला जिल्ह्य़ातील बोरगाव मंजु पोलीस स्टेशन मधे पोलीस कर्मचारी पॉझिटीव्ह आल्यामुळे अतिरिक्त कामाचा तान वाढल्यामुळे त्यावेळी बंदोबस्त कामी असलेले पातुर युनिटचे होमगार्ड सैनिक बोरगाव मंजु पो.स्टे.ला ड्युटी करत असतांना पोलिसांच्या कामाची जबाबदारी पुर्वक धुरा सांभाळली व कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल बोरगावमंजु पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री.हरीष गवळी,पी.एस.आय.

श्रीमती विना पांडे यांनी होमगार्ड सैनिकांना पेढ्यांनी भरलेले टिफीन बाॅक्स बक्षीस देऊन कौतुकास्पद कामगिरी केलेल्याबद्ल पातुर येथील होमगार्ड सैनिकांचे अभिनंदन केले व माणुसकी जपली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here