पातुर | पिंपळखुटा येथे तीन दिवस जनता कर्फ्यू…

पातूर : नजीकच्या पिंपळखुटा येथे वाढत्या कुणाचा प्रादुर्भावामुळे २४,२५,२६,जून असे तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय पिंपळखुटा ग्रामपंचायत घेतला आहे. तसेच विना मास्क लावून शिरताना कुणी आढळल्यास २०० रुपये दंड ,व दुकान उघडल्यास दुकानदाराला ५०० रुपये दंड अशी तरतूद निर्णयांमध्ये करण्यात आली आहे.

पिंपळखुटा येथील ३५ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळला होता त्याच्या संपर्कात आलेले १४ जणांना क्वारंटीन करण्यात आले होते.क्वारंटीन केलेल्या काही जणांच्या संपर्कत आलेले चार जनांना सोमवारी पुन्हा क्वारंटीन करण्यात आले आहे. पिंपळखुटा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गावासह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

त्यामुळे पिंपळखुटा येथील रहिवाशांच्या ग्रामस्थावर येण्यास परिसरातील गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे.सध्या शेती पेरणीचे दिवस सुरू असताना पिक कर्ज, बियाणे खरेदी, बॅंकेत व्यवहार, व इतर कामासाठी परिसरातील गावात जावे लागत आहे. त्यामुळे पिंपळखुटा येथील ग्रामस्थांसाठी बँकेने आठवड्यात व्यवहार करण्यासाठी एक दिवस ठरवून देण्याची मागणी होत आहे.

गाव पूर्णपणे सील करून ग्रामपंचायत ने दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली असून, विना मास्क लावून फिरताना तीन जनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.यावेळी सुनीता रविद्र शेलार,सचिव आर के बोचरे,पोलिस पाटील, तंटा मुक्त अध्यक्ष,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here