पातूर | उमरा पांगरा ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सचिवाला २ लाख २१ हजारापेक्षा जास्त रुपयाचा दंड…

फोटो-सांकेतिक

पातुर तहसीलदार दीपक बाजड यांनी सुनावला दंड… रूपाली हरमकार उपसरपंच आणि इतर 5 ग्रा प सदस्य यांनी अवैध उत्खनन केल्याची केली होती तक्रार…

निशांत गवई,पातुर- तालुक्यातील उमरा पांगरा गट ग्रामपंचायतचे सरपंच केशव त्र्यंबक इंगळे तथा ग्राम सचिव शरद सोपान उंडाळ यांना पातुर तहसीलदार दीपक बाजड यांनी दिनांक 9।2।2022 ला मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याप्रकरणी 2,21,400 रुपयांचा दंड सुनावला…

सविस्तर वृत्त असे आहे की उमरा पांगरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्याई क्लास सर्वे नंबर 38 ।39 ।79 मधील मुरुमाचे अवैध उत्खननसुरू असल्याची तक्रार विठ्ठल मुके यांनी दिनांक1।7।2021ला पातूर तहसीलदार कडे केली होती तर मुरूमचेअवैध उत्खनन वाहतूक केल्याची तक्रार उमरा पांगरा गट ग्रामपंचायतच्या उपसरपंच रूपालीप्रमोद हरमकार आणि इतर 5ग्रामपंचायत सदस्य यांनी पातुर तहसीलदारदीपक बाजड यांच्याकडे 24 ।12 ।2021ला तक्रार केली होती त्यावरून पातुर तहसीलदार यांनी 40 ब्रास मुरुमाचे 2, 16000 हजार दंडाचे आदेश 21 ।10 ।2021ला दिले होते,

तर या आदेशाने व्यथित होऊन सरपंच केशव इगळे आणि ग्रामसचिव शरद उंडाळ यांनी बाळापुर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते त्यावरून उपविभागीय अधिकारी बाळापुर यांनी सदर प्रकरणी फेर चौकशी करून मोजमापे घेऊन आदेश पारित करण्याबाबत आदेश दिले होते तर पातुर तहसीलदार यांचा 12।10 ।2021 चा आदेश रद्द केला होता त्यानंतर सदर प्रकरणीउपसरपंच रूपाली हरमकार आणि इतर पाच ग्रामपंचायत सदस्य यांनी निवेदन देऊन याप्रकरणी उमरा येथील गट सर्वे नंबर 38। 39 ।79 ई क्लास या शासकीय जमिनीमधून 40 ब्रास मुरमाची उतखणं न आणिवाहतूक केली याबाबत गट ग्रामपंचायत उमरा पांगरा ची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेले नाही.

तसेच उपसरपंच आणि सदस्य यांना विश्वासात सुद्धा घेण्यात आले नाही असे निवेदन पातूर तहसीलदार यांना सादर केल्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी 9000हजार रुपयाची ऑनलाईन काढलेली रॉयल्टी तसेच मुरूम टाकण्याबाबत काढलेले पैसे 21,500 ऑनलाईन विवरणपत्र निवेदना सोबत जोडले तर याप्रकरणी उमरा येथील तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचे स्पष्टीकरण मागितल्यानंतर उमरा पांगरा येथील ईक्लास मध्ये उत्खनन कोणी केले याबाबत माहिती नाही असाअहवाल तलाठी यांनी सादर केला परंतु या घटनेचे गांभीर्य पाहून मौजे उमरा येथे पुन्हा स्थानिक चौकशी केली असता गट ग्रामपंचायत उमरा पांगरा सरपंच सचिव यांनी उत्खनन केल्याचा तिसरा अहवाल 1।10।2021ला तलाठी यांचे स्पष्टीकरण मध्ये नमूद केला होता प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन उत्खनन झालेल्या खड्ड्याचे प्रत्यक्ष मोजमाप पातुर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता यांनी करून त्यामधून 41 ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचा अहवाल सादर केला तर दुसऱ्या बाजूने सरपंच आणि ग्रामसचिव यांनी या प्रकरणी जबाब सादर करताना उपसरपंच आणि इतर सदस्य विनाकारण या प्रकरणांमध्ये गोवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जबाबात सांगितले तसेच सर्वे नंबर 38 ।39 ।79 मध्ये मुरूम माती उत्खनन केलेले नाही.

उमरा पांगरा येथील रस्त्यासाठी मुरुमाचा वापर केला नाही मुरुमाच्या वाहतुकीबाबत गट ग्रामपंचायत पांगरा येथून कोणतेही बिल काढलेले नाही यासह इतर सगळे आरोप चुकीचे असल्याचे सांगून तक्रार करता गणपत मुके यांच्या म्हणण्यानुसार तलाठी मौजे उमरा पांगरा यांनी 1।10।2021 रोजी बेकायदेशीर पंचनामा करून सरपंच सचिव गट ग्रामपंचायत उमरा पांगरा यांनी उत्खनने रस्त्याच्या वापरासाठी केल्याचे सांगितले दोन्हीकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर पातुर तहसीलदार यांनीतलाठी यांचा तिसरा अहवाल आणि पातुर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता यांचा 41 ब्रास मुरमाचे उत्खनन झाल्याचा अहवाल गृहीत धरून मुरुमाचा बाजार भाव 1000 त्याचे पाच पट प्रति ब्रास 5000 प्रमाणे2,5000( दोन लाख पाच हजार )स्वामित्व धनाची रक्कम रुपये 400प्रति ब्रास प्रमाणे 16,400 प्रमाणे 41 ब्रास साठी 2,21,400 रुपये दंड ग्रामपंचायत सरपंच केशव इंगळे आणि ग्राम सचिव शरद उंडाळ यांना सुनावला तर सदरची रक्कम यांच्यामध्ये विभागली असून 1,10,700 एवढी निश्चित केली आहेत सदरची रक्कम एक महिन्याच्या आत जमा करावी अन्यथा महसुलाची थकबाकी सदर रक्कम वसूल करण्यात येईल असे आदेश दिल्यामुळे सरपंच आणि ग्रामसचिव यांच्यासह तालुक्यातील अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे

विद्यमान ग्रा प चे सरपंच यांनी गौण खनिजाची अवैधरित्या चोरी केल्या सारखेच प्रकरण आहे या प्रकरणांमध्ये महसूल विभागाने योग्य ती कार्यवाही करून दंडाची वसुली करावी जेणेकरून यापुढे कुठल्याही ग्रामपंचायत चे सरपंच असे करणार नाहीत या गोष्टीला आळा बसेल…सौ रुपाली प्रमोद हरमकार उपसरपंच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here