पातूर येथे अवैध अवैध वरली मटका जुगारावर पोलिसांचा छापा…

पातुर तालुका प्रतिनिधी

पातुर पोलीस टेशन च्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या 2/2/22 रोजी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार कडुन खात्रीलायक बातमी मिळाली कि विजय टॉकीज परिसर पातूर येथे पैश्याच्या हारजीत वर वरली मटक्याच्या जुगार खेळत आहे अश्या खात्री लायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहाणी करून रेड केली असता.

तेथे (1)मो. मुशरफ मो. उस्मान 46 रा. पातूर (2)नशीब खान लतीफ खान 41 रा. खैरमोहमद प्लॉट अकोला (3)मो. आरिफ मो. रफी 40 रा. पातूर हे मिळून आले त्याचे कडे 2 मोबाईल फोन,नगदी 11,330रु, असा एकूण 31,300रु.चा मुद्देमाल मिळून आला..त्यांना त्याचे धंदा मालकाचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव (4)मो. फाईम मो. उस्मान असे सांगितले..त्यांचे हे कृत्य महा. जु. का.अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन पातूर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक .. जी श्रीधर साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख श्री विलास पाटील साहेब यांनी व त्यांचे पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here