२ लाख २० हजाराची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला पातूर पोलिसांनी शिताफीने केली अटक…

पातुर – निशांत गवई

महाराष्ट्र शासन अंधश्रद्धा निर्मूलना करिता विविध योजना राबवित असले तरी आजही ग्रामीण भागात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून अनेक जण याला बळी पडत असल्याच्या घट्ना आजही सुरू आहेत पातुर तालुक्यात असलेले कार्ला या गावांमध्ये राहणाऱ्या तेजराव ओमकार वाकोडे वय 45 वर्ष याला एका भोंदूबाबाने धन काढून देण्यासाठी दोन लाख वीस हजाराची मागणी करून फसवणूक केल्याची घटना पातुर पोलिसांच्या कर्तव्यदक्ष ते उघड झाले,

असून यामध्ये मुख्य आरोपी असलेल्या भोंदूबाबाला पातुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, परिविक्षाधीन अधिकारी पोलीस निरीक्षक मीरा सोनोने, अरविंद पवार मेजर, मनिष घुगे आदींनी केवळ मोबाईल ट्रॅक वरून वाशिम जिल्ह्यातून मुख्य आरोपी असलेल्या भोंदू बाबाला 21 एप्रिल रोजी अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून अखेर हा बाबा गजाआड झाला आहे.

या भोंदू बाबा चे नाव गुड्डू भैया उर्फ कर्तारसिंग चंदन सिंग चितोडिया वय 37 वर्ष राहणार हीरापुरा तालुका कॉलारस जिल्हा शिवपुर मध्य प्रदेश येथील आहे गेल्या वर्षभरापासून या भोंदूबाबाचा तपास सुरू होता मात्र पोलिसांना हुलकावण्या देत तो यशस्वी होत होता अखेर मोबाईल ट्रक वरून वाशिम जिल्ह्यातून या भोंदू बाबाला पातूर पोलिसांनी अटक केली आहे.

पातुर पोलिसात याबाबत अपराध क्रमांक 480/ 20 कलम 417, 420, 34 भादवी नुसार कलम 3 महाराष्ट्र नरबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये सदर घटना एप्रिल 2020 ते जून 2020 झाली होती यातील भोंदू बाबा ने धन काढून देण्यासाठी दोन लाख वीस हजाराची फसवणूक केली होती त्यामुळे या भोंदूबाबाला अखेर अटक करण्यात आली आहे.

या अटक कामी जनुना येथील पोलीस पाटील निलेश वसंतराव ठाकरे आणि जेथुन या भोंदू बाबाला अटक केली चेतन माणिकराव लोमटे यांनी पोलिस प्रशासनाला मोलाची मदत केल्याने हा आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.या प्रकरणांमध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी दीपक अशोक मोपलवार वय 30 वर्ष राहणार संतोषी माता नगर अल्लाळा प्लाट वाशिम यास यापूर्वी 10मार्च2019रोजी अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

या आरोपीने दिलेल्या पुढील माहितीवरून सदर तपासाची चक्रे फिरवली पातूर पोलिसांनी भोंदू बाबा असलेल्या मुख्य आरोपीला सुद्धा अटक केली आहे.सविस्तर हकीकत अशी की यातील आरोपी गुड्डू भैया याने जडीबुटी चे दुकान पातूर तालुक्यातील कार्ला येथे लावले होते तेव्हा त्याच्याजवळून मुळव्याध औषध पाचशे रुपये मध्ये यातील तेजराव वाकोडे ने विकत घेतले होते.

त्यामुळे त्याचा मूळव्याधीचा आजार बरा झाला होता त्यानंतर एप्रिल दोन हजार वीस मध्ये त्याने काहीतरी टॉनिक म्हणून खाण्यासाठी दिले तेव्हापासून तेजराव ला आरोपी गुड्डू भैया ची ओढ लागली घरी तो नेहमी येत होता व तेजाराव ला म्हणत होता की तुमच्या घरामध्ये सुख शांती राहत नाही त्यामुळे तुम्ही पूजा करून घ्या तसेच तुमच्या घरांमध्ये 50 किलो धन सोने आहे.

धन काढण्यासाठी 20 हजार रुपयांची औषधे व पूजेचे साहित्य आणावे लागेल धन काढली नाही तर तुमचे घरचे कोणीतरी मरून जाईल ते धन तुम्हाला त्रास देईल अशी भीती दाखविल्यामुळे तेजराव ने वीस हजार रुपये जमवून गुड्डू भैया सोबत वाशिम येथे आरोपी नामे दीपक अशोक मोपलवार यांचे पंचकर्म आयुर्वेदिक दुकान येथे जाऊन त्याचे जवळवीस हजार रुपये देण्याचे सांगितले पैसे दुकानदार यालादिल्यानंतर काहीतरी औषधी दुकानदाराने दिली.

त्यानंतर त्यास साठ रुपयाचे औषधे ची आवश्यकता होती परंतु लोकडवून असल्याने त्यांना ते औषध मिळाले नाही काही दिवसांनी गुड्डू भैया यांनी फोन करूनतेजराव ला औषध उपलब्ध झाल्याचे सांगितले दिनांक 2 जून 2020 रोजी तेजरावचे घरी आला व त्यास सांगितले की धन आजच काढायचे आहे नाहीतर तुमचे घरचा कोणीतरी मरणार आहे.

असे म्हणून गुड्डू भैया ने पूजेचे साहित्य सामान दूध बांगड्या कापूर अगरबत्ती पंचरंगी रांगोळीचे पीठ लिंबू सांगितले ते सामान आणल्यानंतर गुड्डू भैया याने पूजा पाती केली खड्डा खोदला व त्यामध्ये तांब्याचे लहान भरणे ठेवले व त्याला हात लावायचा नाही सांगितले त्यानंतर गुड्डू ने फोनवर सांगितले चाळीस हजार रुपये ग्राम प्रमाणे औषध आहे ती पाच-दहा ग्रॅम लागत आहे.

त्याकरता दोन लाख रुपये खर्च आहे औषध जर आली नाही तर तुमच्या घरामध्ये साप, दैत्य, नागकन्या तुमच्या कुटुंबाला पाच दिवसाच्या आत मारून टाकेल अशी धमकी दिल्याने तेजराव ने पैशाची जुळवाजुळव केली तेव्हा गुड्डू भैया यांनी दिनांक पाच जून 2020 रोजी आटोने तेजराव व त्याची पत्नी यांना बसवून आरोपी दीपक मोकलवार यांचे वाशीम येथील दुकान वर नेले व तेथे तेजराव यांनी दोन लाख रुपये दुकानदार यांना दिले.

त्याने त्याबदल्यात पाच ग्रॅम औषध गुड्डू भैया कडे दिले तेव्हा तेजराव सह घरी आले सदरची पाच ग्राम औषधे तेजराव कडे देऊन सांगितले की दोन तारखेला दुधामध्ये टाक असे सांगितले व उद्या येऊन धन काढून देतो असे सांगितले दुसऱ्या दिवशी तेजराव ने फोन केला,

असता त्याचा फोन बंद होता त्यानंतर खड्ड्यातील बंद केलेले भरणे हे तेजराव ने उकरून पाहिले असता त्यामध्ये धना ऐवजी माती भरलेली दिसली अशाप्रकारे येथील आरोपी त्यांनी गुप्तधन काढण्याकरता तेजराव ला भीती दाखवून त्याची एकूण दोन लाख 20 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघड झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here