हातात देशी कट्टा घेवून थैमान घालणाऱ्याला पातुर पोलिसांनी केली अटक…

शहरातील समर्थ नगर येथे हातात देशी कट्टा घेऊन थैमान घालणाऱ्याला पातूर पोलिसांनी ताब्यात घेतले सदर चि घटना आज सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान घडली…

सविस्तर वृत्त असे कि शहरातील समर्थ नगर येथील प्रशांत किशोर येरखडे वय 21 वर्ष हे आपल्या परिवारासोबत राहतात सायंकाळी अचानक त्यांच्या शेजारी ज्ञानेश्वर रामचंद्र गोमासे वय 41 हा हातात देशी कट्टा घेऊन आला व येरखडे यांचे दार वाजवीन्यास सुरुवात केली.

प्रशांत येरखडे याने दार उघडून पहिले असता ज्ञानेश्वरयाने हातातील बंदूक प्रशांत वर रोखली प्रसंगवध राखत प्रशांतने दार लावताच ज्ञानेश्वर याने घराच्या खिडक्या चि तोडफोड करण्यास सुरुवात केली येरखडे परिवार ने तात्काळ ठाणेदार गजानन बायस यांना घटनेचि माहिती दिली असता ठाणेदार गजानन बायस यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून ज्ञानेश्वर गोमासे याच्या जवडील बंदूक हिसकावून घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

ज्ञानेश्वर गोमासे कडून देशी कट्टा व दोन जिवंत कारतूस जप्त करण्यात आले असून फिर्यादी प्रशांत ये रखडे यांच्या तक्रारी वरून आरोपी ज्ञानेश्वर गोमासेयाचे विरुद्ध अप नंबर 450, 307, 294, 427, 3, 25 भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.   

सदर चि कारवाई ठाणेदार गजानन बायस हेका सोहेल खान, विपुल सोळंके, अनुप आसाटकर, दिपक तायडे यांनी केली. पातूर पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत देशी कट्टा व 2 जिवंत काडतूस ताब्यात घेण्यात आले हि कारवाई पहिल्यांदाच झाल्या चे जुनेजाणते सांगत आहे                   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here