पातुर | दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू,एक गंभीर…तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच…

पातूर तालुका प्रतिनिधी : अकोला पातूर रोडवरील भंडारज फाट्यावर दुचाकीला अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे कळते.

सविस्तर वृत्त असे की मो.हबीबोद्दीन मो.नजमोद्दीन रा.किल्ला परिसर पातूर व सैय्यद नासिर सैय्यद शेर अली रा.अकोला हे दोघे दुचाकी क्रमांक MH 30 AU 2430 ने

अकोल्याकडून पातूरकला येत असतांना भंडारज फाट्यानजिक अचानक रोही आडवा येऊन दुचाकीवर धडकला यात दोघांनाही गंभीर मार लागला.पातूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना पुढील उपचाराकरिता शासकीय रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले असता मोहम्मद हबीबोद्दीन मोहम्मद नजमोद्दीन रा.किल्ला परिसर पातूर यांचा उपरादरम्यान मृत्यू झाला.


यावेळी घटनास्थळी ए.एस.आय. दिनकर गुडदे, पोलीस कॉस्टेबल अनिल भुसारे यांनी जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले.पुढील तपास ठाणेदार गजानन बायस यांचे मार्गदर्शन खाली पातूर पोलीस करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here