पातूर येथे एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये हाणामारी !..सहा जणांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारी वरून पातुर पोलिसात गुन्हा दाखल

फोटो - सांकेतिक

पातुर तालुका प्रतिनिधीः

पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जमदार प्लॉट मध्ये एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना 1 फेब्रुवारी मंगळवारी झाली असून यामध्ये सहाजणा विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पातूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शेख असलम शेख लाल 34 पातूर यांचे तक्रारीवरून आरोपी शेख अरु शेख इमाम, शेख मोसीन शेख इमाम ,शेख असिफ शेख इमाम सर्व राहणार जमदार प्लॉट पातूर यांनी 1 फेब्रुवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान फिर्यादी भाजीपाला आनत असताना शेख अरू शेख ईमाम याने फिर्यादीचे अंगावर दुचाकी आणून त्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व घरी परतल्यानंतर आरोपीचा भाऊ शेख मोहसीन शेख आसिफ हे तिच्या घरी गेले व शिवीगाळ केली यामधील एकाने तिच्या डोक्यावर व पाठीवर हातावर लोखंडी फावड्याने जखमी केले.

यावरून तीन जणांविरुद्ध भांदवि कलम 452 324 323 504 506 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या गटातील फिर्यादी शेख असिफ शेख इमाम वय 25 वर्ष राहणार पातुर याचे तक्रारीवरून आरोपी शेख असलम शेख लाल वय 34 वर्ष नजराना बहिण, शेख आजम सर्व राहणार जमदार प्लाट पातुर यांचे विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून माझा भाऊ सकाळी शेख आरिफ ट्रॅक्टर साठी डिझेल आणण्यासाठी पेट्रोल पंपावर मोटरसायकलने जात असता त्यावेळी येथीलच शेख असलम शेख लाल हा माझ्या भावाच्या मोटर सायकल समोर येऊन त्याने गाडी अडवली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली .शेख असलमची बहीणीने ही मला लोखंडी फावड्या ने मारहाण करून जखमी केले भांडणांमध्ये शेख असलम चा भाऊ आजमने ही कमरेवर मारहाण करून तिथून निघून गेला.

आरोपीविरुद्ध अपघात नंबर50/22 कलम 341 324 323 504 506 34 बातमीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे परस्पर विरुद्ध झालेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हिम्मत डिगोळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here