Breaking| आईने दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपविली…पातुर तालुक्यातील घटना…

पातूर : तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम चांगेफळ येथील एका महिलेने आपल्या दोन अपत्यासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून गावात शोककळा पसरली आहे.

आज दिनांक 18 ऑक्टोबर च्या सायंकाळी उघडकीस आली घटनेची माहिती मिळच चान्नी चे कर्तव्यदक्ष ठाणेदार वाघ हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी पोहचले आहेत.

प्राथमिक माहिती नुसार मृतक माता पूजा गजानन काळे वय 28 वर्ष, तनु गजानन काळे वय 8 वर्ष तर अंदाजे 10वर्षीय चिमुकल्यासह माते ने विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्या चे कारण वृत्त लिहिसतोवर स्पष्ट झाले नसून पुढील तपास चान्नी चे ठाणेदार करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here