खाजगी रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या…

मनोर, ता.19
बोईसरच्या चिन्मय रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी मारून शनिवारी (ता.19) सकाळी एका रुग्णाने आत्महत्या केली.चंद्रकांत चौधरी (वय.42)असे मयत इसमाचे नाव असून ते बोईसरच्या शुक्ला कंपाउंडचे रहिवासी होते

शनिवारी सकाळी चिन्मय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.मयत चंद्रकांत चौधरी मुतखड्याच्या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून चिन्मय रुग्णालयात उपचार सुरू होते. मूळचे जळगाव जिल्ह्याचे रहिवासी असलेले चंद्रकांत चौधरी तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अनु फार्मा या कारखान्यात कामाला होते.

त्यांच्या पत्नीच्या मृत्यू झाला असून त्यांच्या मागे एक मुलगा आहे.या प्रकरणी तपास बोईसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here