एसटीच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवाशी वाहतूक…

स्थानिक सहा आसनी रिक्षा चालक संघटनेकडून कारवाईची मागणी…

मनोर – अलीकडे एसटी मार्फत मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे.तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून मालाची वाहतूक करण्याचे बंधन असताना चालकाकडून प्रवाशी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

मुंबई सेंट्रल एसटी आगाराच्या मालवाहू वाहनात रविवारी (ता.18) मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जव्हार फाट्यावर प्रवासी भरीत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून याप्रकरणी कारवाईची मागणी पुढे येत आहे.मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जव्हार फाट्यावर रविवारी सकाळी एसटीच्या मुंबई सेंट्रल आगाराच्या मालवाहु वाहनात प्रवाशी बसवले जात होते.

यावेळी तेथे उपस्थित स्थानिक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी रिक्षा चालकांनी बेकायदा प्रवाशी वाहतुकीला विरोध करीत बेकायदा प्रवाशी वाहतुकीचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी कारवाई करण्यात मागणी स्थानिक सहा आसनी रिक्षा चालक संघटनेचे सदस्य अजय पाटील यांनी केली आहे.

दरम्यान मालवाहतूक करणारे वाहन मुंबई सेंट्रल एसटी आगाराचे असून मुंबई हुन माल घेऊन जव्हारच्या दिशेने निघाले असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी चालकाला काम थांबवण्याचा सूचना दिल्या असून कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here