३४५ प्रशिक्षणार्थी क्रिडा शिबिरात घेतला भाग…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्हातील तालुका तिरोडा येथे १डिसेंबरला स्व. मोतीलाल पटेल व स्व. गो. मो. कोलते सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ १५ वा शितकालीन विविध खेळ प्रशिक्षण शिबिराचे जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया जिल्हा वुशु, आर्चरी, कराटे, किकबॉक्ससिंग, कबड्डी, आरोबिक असो. व तालुका क्रीडा समिती तिरोडा द्वारे आयोजित पाच दिवशी शिबीराचे उद्घाटन मा. रमेशचंद्र झरारीया अध्यक्ष शंकर शिक्षण सस्था,

मा. संजीव कोलते सदस्य शंकर शिक्षण सस्था, मा.सुनील भाऊ पालांदूरकर उपाध्यक्ष न. प तिरोडा ,डॉ. अविनाश जैस्वाल संचालक गो. को. बँक, अडव्होकेट माधुरीताई रहांगडाले , मा. अनुप बोपचे सस्थापक एस.डी. बी. विद्यालय, मा. कन्हैयालाल रहांगडाले मुख्याध्यापक उ. बु. शाळा तिरोडा, मा. विकास बारापात्रे प्राचार्य श. मी. विद्यालय, जितसींग जगणे मुख्य लिपिक तिरोडा या मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वल करून शिबिराचे विधिवत उद्घाटन करण्यात आले होते.

या वेळी मान्यवरांनी सांगितले की मागील काही वर्षां पासुन या शिबिराचे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विद्यार्द्याना मोठा फायदा खेळात झाला दिसुन येते .जसे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंचे पदक प्राप्त करत आहेही जिल्ह्याकरिता गौरवाची बाब आहे.शिबिरात 345 प्रशिक्षनार्थीनी सहभागी झाले होते.

या शिबिरात वुशु,आर्चरी, राईफल शुटिंग, कराटे, किकबॉक्ससिंग, तायकाडॉ, आरोबिक,योगा-प्राणायाम या खेळाचे प्रशिक्षण विशेषतज्ञा द्वारे देण्यात आले.शिबिराचे आयोजन तालुका क्रीडा समिती,तिरोडा क्रीडा संयोजक सुनील शेंडे,तालुका क्रीडा समिती चे अध्यक्ष राजेश असाटी, गुणवंत क्रीडा पुरस्कारथी संजय नागपुरे,

संदीप मेश्राम, सुरेश शहारे, सुनील ठाकरे ,दीपक घरजारे, सचिन ढबाले, खुशाल पिंजरघरे, गौरव जैस्वाल,सचिन हारोडे,अमन नंदेश्वर,वल्लभ शेंडे ,अमोल चचाने उपस्थित होते.यावेळी सुत्र संचालन प्रदीप मेश्राम यांनी केले तर संजय नागपुरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here