सांगलीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाच ठिकाणी पार्किंगची सोय :- मनपा आयुक्त नितिन कापडणीस…

मनपा आयुक्त नितिन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पार्किंगची अंमलबजावणी: उपायुक्त रोकडे आणि सहायक आयुक्तांकडून पाहणी…

सांगली – ज्योती मोरे

सांगलीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेकडून पाच ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मनपा आयुक्त नितिन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पार्कींग ठिकाणे आजपासून सुरू करण्यात आली आहेत. यासाठी उपायुक्त राहुल रोकडे आणि सहायक आयुक्त नितीन शिंदे यांनी या पार्किंग ठिकाणची पाहणी केली.

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यामुळे शहरात वाहतुकीत वाढ झाली आहे. यामुळे शहरातील मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगली शहरात पाच ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी पार्किंग करण्याचे निश्चित केले होते. या पाचही जागांची पाहणी आयुक्त कापडणीस यांनी करीत जागा निश्चित केल्या आहेत.

शनिवार पासून सांगली शहरातील बाजारपेठेत दीनानाथ नाट्यगृह, वैरण बाजार, खंदक परिसर, जयश्री टॉकीज आणि आनंद टॉकीज शेजारील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबतची फलक उभारून नागरिकांना वाहने रस्त्यावर न लावता पार्किंग ठिकाणी लावण्याचे आवाहन केले जात आहे. यावेळी शहरातील पार्किंग ठिकाणची पाहणी उपायुक्त राहुल रॉकडे,

सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे यांनी करत पार्किंग ठिकाणे कार्यान्वित केली. तसेच दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर पार्क न करता महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणावर लावावीत असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.

तर महापालिकेने वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पार्किंग ठिकाणं निश्चित केली असून हे व्यापारी तसेच ग्राहकांनी आपलो वाहने पार्किंगसाठीच्या जागेत पार्क करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन माजी नगरसेवक शेखर माने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here