सामाजिक सलोखा, बहुजनवाद स्वीकारून व्यसनमुक्ती गाव घडवण्याचे मराठा सेवा संघाचे महासचिव सौरभदादा खेडेकर यांचे आवाहन…
बुलढाणा – अभिमान शिरसाट
टाकरखेड वायाळ ग्रामपंचायत वर संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष रामेश्वर वायाळ यांनी परिवर्तन ग्राम विकास पॅनल च्या माध्यमातून 6+1 असा दणदणीत विजय मिळवला आहे. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांसह रामेश्वर वायाळ यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांनी आपले विचार व्यक्त करते वेळेस सर्वांना आदर्श ग्राम घडवण्याचे आवाहन करून सामाजिक सलोखा, बहुजनवाद स्वीकारून व्यसनमुक्ती गाव घडवण्याचे आवाहन केले.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री, पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी मराठा मार्ग जिजाऊ विषेशंक 2021 सह छत्रपती शिवराय यांचे तैल चित्र प्रतिमा भेट देऊन सर्व नवनिर्वाचित सदस्यांना गौरवित केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी वायाळ यांचे सोबत धनसिराम शिपणे साहेब जी .प .सदस्य तथा प्रदेश अध्यक्ष चर्मकार संघटना महाराष्ट्र, सह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य स्वाती गहिनीनाथ वायाळ ,प्रीती बाबासाहेब नांदवे, निलेश रावसाहेब पऱ्हाड, लीलावती सुखदेव वायाळ,
मीरा दिलीप चिंचोले, निवृत्ती गोपाळ खरात, संगीता गजानन वायाळ ,मनोज उद्धव वायाळ , गहिनीनाथ अण्णा वायाळ सह परिवर्तन ग्राम विकास पॅनल टाकरखेड वायाळ तालुका देऊळगाव राजा चे पदाधिकारी उपस्थित होते .