राहुल मेस्त्री
कोगनोळी दि. 6 रोजी हंचिनाळ तालुका निपाणी येथील सचिन उत्तम कांबळे हा तरुण हंचिनाळ येथून कोगनोळी येथे कामाला येत असताना कोगनोळी येथील पी अँड पी सर्कलमध्ये सचिनला रस्त्यावरती खाली पडलेलं खिशातील पाकीट आणि त्या पाकिटामधील रोख रक्कम वीस हजार रुपये व ड्रायव्हिंग लायसन सापडले.
यानंतर सचिनने येथील कुणाचे आहे का चौकशी केली. व तो कोगनोळी येथील लकी फर्निचर मध्ये कामावर गेल्यानंतर त्या ठिकाणच्या तरुणांना हा प्रकार सांगून ती ड्रायव्हर लायसन व्हाट्सअप वरती व्हायरल केली .आणि कुणाची आहे त्यांनी ओळख पटवून सदर ड्रायव्हिंग लायसन्स ,खिशातील पाकीट आणि रोख रक्कम 20000 घेऊन जावे असे सांगितले.
ड्रायव्हिंग लायसन व्हाँट्सअप वरती व्हायरल झाल्यानंतर कोगनोळी येथील बाळासाहेब पाटील यांची होती असे समजल्या नंतर काही तरुणांनी बाळासाहेब पाटील यांना फोनवरून संपर्क साधला. व आपली लायसन व पाकीट पडले आहे का विचारले. आणि यानंतर बाळासाहेब पाटील यांनी सचिनची लकी फर्निचर येथे जाऊन भेट घेतली .व सदर पडलेल्या वस्तूची ओळख पाठवून आपल्या ताब्यात घेतली.
सचिनच्या या प्रामाणिकपणामुळे बाळासाहेब पाटील यांनी त्याचे आभार मानले. व दिनांक सात रोजी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते विर सदन या निवासस्थानी सचिन कांबळे याचा सत्कार केला. याबद्दल सचिन कांबळे यांना विचारले असता म्हणाले मी एक मोलमजुरी करून राहणारा युवक असून ही रक्कम ज्याची पडली होती. त्याना परत करणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं अशी प्रतिक्रिया दिली.