पालघर | खड्डेमय रस्त्याचे आमदार खासदार खडकाळ मार्ग नामकरण करून वेती वरोती मस्थांचे अनोखे आंदोलन…

प्रतिनिधी पालघर

डहाणू तालुक्यातील वेती-मुरबाड-पिंपळशेत-वांगर्जे ते तवा या सुमारे १५ किमीचा रस्त्याच्या दुरावस्थेला कंटाळून येथील ग्रामस्थांनी पोकळ आश्वासने देणार्‍या लोकप्रतींनिधींच्या विरोधात अनोखे आंदोलन सुरू केले आहे.लोकसभा,विधानसभा आणि जिल्हा परीषद निवडणूक प्रचारात हा खड्डेमय रस्ता नवीन बनविण्याचे आश्वासन देऊन त्याकडे दुर्लक्ष करून मतदारांच्या तोंडाला पाने पुसणारे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत आणि राष्ट्रवादी कोंग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांच्या नावे खडकाळ मार्ग असे नामकरण करून निषेध नोंदविला आहे.

डहाणू-नाशिक राज्यमार्गावरील वेती ते मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा या गावाला जोडणार्‍या या १५ किमी अंतराच्या रस्त्याची मागील १५ वर्षांपासून दुरूस्ती न झाल्याने या मार्गावर मोठमोठे खड्डे पडून प्रचंड दुरावस्था झाली आहे.

वेती,मुरबाड,पिंपळशेत आणि वांगर्जे हे जवळपास ५ हजार आदीवासी लोकवस्ती असलेले गावपाडे या रस्त्यावर असून बाजार,दवाखाने,बँक,शाळा-विद्यालय आणि इतर कामासाठी कासा या ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो.परंतु रस्त्याची अवस्था भीषण असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक आणि प्रवासी यांचे अक्षरक्ष कंबरडे मोडायची वेळ आली आहे.

वेती ते तवा या रस्त्याची दुरूस्ती आणि रस्ता संपूर्ण नवीन बनविण्यासाठी या गावपाड्यातील त्रस्त नागरीकांनी अनेकवेळा जिल्हा परीषद सदस्य,आमदार आणि खासदार यांना साकडे घातले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी शिवसेनेचे उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांनी प्रचार करताना मुरबाड लोकांना वेती ते तवा रस्ता डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी दोन वेळा नारळ फोडून त्यांची या कामाचा शुभरंभाचा कार्यक्रम देखील केला.परंतु नारळ फोडून २ वर्षे झाली तरी अजून या रस्त्याचे काम काही चालू झालेले नाही.त्याचप्रमाणे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी देखील जिल्हा परीषद निवडणूक आणि पोटनिवडणुकीत रस्ता करून देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते.

परंतु त्यांचे आश्वासन देखील पोकळ ठरले आहे.२२ जानेवारी रोजी मुरबाड गावातील एका गरोदर महिलेने खराब रस्त्यामुळे वेळेवर दवाखान्यात पोहोचता न आल्याने रिक्षामध्येच नवजात अर्भकाला जन्म दिला. यामुळे या परीसरातील नागरीक अतिशय संतप्त झाले असून बेजबाबदार राजकारणी म्हणून शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत आणि राष्ट्रवादी कोंग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांच्या नावे खडकाळ मार्ग असे नामकरण करून मोर्चा काढत निषेध नोंदविला आहे.

वेती वरोती मुरबाड हा रस्ता गेल्या दहा ते बारा वर्षा पासून खडेमय आसल्याने या रसत्या वरुण प्रवासा करणे दूरच या पायी पन चालत जाऊ शकत नाही गेल्या दहा दिवसांपूर्वी एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना त्या महिलेची रस्त्यातच प्रस्तुति झाली आमदार भुसारा व खासदार गावीत यांनी आम्हाला हा रस्ता बनवून देतो असे आश्वासन दिलं होतं परंतु त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आम्ही या रस्त्याचे नाव आमदार भुसारा व खासदार गावित खडतर मार्गा असे ठेवले आहे.

हेमंत धांमेहेर
स्थानिक ग्रामस्थ मुरबाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here