पालघर | नौदल अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण!…

विनायक पवार,पालघर

नौदलातील अधिकार्‍याचा पालघर जिल्ह्यामधील वेवजी तलासरी येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. सैनिकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याने हे प्रकरण चर्चेत आले होतं. मात्र तपासादरम्यान हे सर्व प्रकरण अपहरण व खंडणीचे नसून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची पालघर पोलीस पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

५ जानेवारी रोजी सूरजकुमार दुबे या नौदलातील सैनिकाला तलासरी तालुक्यातील वेवजी वैजलपाडा गाव हद्दीतील डोंगराळ जंगलात आणून त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. खंडणीसाठी अपहरण करून मारून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब अधिकाऱ्याने मृत्यूच्या आधी घोलवड पोलिसांकडे दिला होता. याप्रकरणी पालघर पोलिसांची दहा पथके तयार करून विविध ठिकाणी तपास सुरु होता.

तक्रारीत ३० जानेवारी रोजी चेन्नई विमानतळाच्या बाहेरुन अज्ञात व्यक्तीने आपलं अपहरण केल्याचा उल्लेख होता. मात्र चेन्नई विमानतळ, विमानतळाजवळ असलेल्या एका हॉटेलमधील आणि एका बस स्टॅण्डवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सूरजकुमार दुबे मुक्तपणे वावरत असल्याचे पुरावे प्राप्त झाल्याचं पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here