चोरी करून हवेत गोळीबार करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलिसांना अवघ्या चार तासात यश…

पालघर – मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबोली येथील आकाश हॉटेलवर अग्निशस्त्राचा धाक दाखवत चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या अवघ्या चार तासात मुसक्या आवळण्यात पालघर पोलिसांना यश आलंय.

काल मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास या चोरट्यांनी आकाश हॉटेलवर जाऊन शस्त्राचा धाक दाखवत काउंटर मधील एक लाख दहा हजार रुपयांची चोरी केली . त्यानंतर हॉटेल मालक आणि कामगारांनी या चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर या चोरट्यांनी हवेत गोळीबार केला.

या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही . मात्र आणलेली आय 10 कार हॉटेलच्या आवारातच सोडून चोरटे पसार झाले. यासंदर्भात कासा पोलीस ठाण्यात 394 , 397 , 34 , आर्म एक्ट कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार कोम्बिंग ऑपरेशन करून या तीनही चोरट्यांना अवघ्या चार तासात पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलय . या कोंबिंग ऑपरेशन मध्ये पोलीस अधीक्षक यांच्यासह एकूण 120 अधिकारी आणि कर्मचारी होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here