पालघर जिल्हा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून पालकमंत्री दादा भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन…

आठवड्याभरात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा अल्टिमेटम.

डहाणू – जितेंद्र पाटील

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला मिळालेल्या तात्पुरत्या स्थगिती बाबत पुनर्विचार याचिका तसेच पालघर जिल्यातील, सकल मराठा समाजाच्या मागण्या याविषयी जर योग्य पावले उचलली नाहीत तर मराठा समाज पालघर जिल्ह्यात उग्र आंदोलन पुकारून महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आलाय.

पालघर जिल्ह्यातील मराठा समाजसाजे समन्वयक, सर्व तालुक्यातील तसेच राज्य समन्वय याप्रसंगी हजर होते पालक मंत्री दादाजी भुसे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठा आरक्षण तसेच मराठा भवन, मराठा वस्तीगृह, मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेणे विषयी शासन व ते स्वतः पालकमंत्री म्हणून सोबत राहून योग्य ती मदत करतील असं आश्वासन पालकमंत्री यांनी यावेळी दिल.

याप्रसंगी पालघर तालुक्यातील आमदार यांनीही मराठा समाजाच्या प्रश्नावर ते मराठा समाजासोबत असल्याचे आश्वासन दिल आहे.या वेळी जिला समनव्यक संतोष मराठे,बाबा गुंजाळ, कृष्णा देशमुख प्रमोद जाधव,वैभव जाधव,तेजस पवार,ऊर्मिला काटकर, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here