पालघर उप-कार्यकारी अभियंता म.रा.वि.यांना लाच घेताना अँन्टी करप्शन ब्युरो पालघर यांनी रंगेहात पकडले…

पालघर – भरत दुष्यंत जगताप

पालघर: अँन्टी करप्शन ब्युरो ठाणे,कँम्प पालघर यांनी पालघर येथिल म.रा.वि.वि.मंडळा मधील वर्ग दोन चे उप-कार्यकारी अभियंता यांनी २५०००/रू.ची लाच पंचासमक्ष स्विकारतांना रंगेहात पकडले.

या बाबतीत असे समजते की अँन्टी करप्शन ब्युरो ,ठाणे,कँम्प पालघर यांच्या कडे ,एका इलेक्ट्रीकल काँन्ट्रेक्टर यांनी तक्रार नोंदविली की,मी एक इलेक्ट्रिकल काँक्ट्रक्टर असून रो बंगल्याचे व बिल्डींगचे विद्युत जोडणीचे/ ट्रांन्फामॆर बसविण्याचे काम घेतले होते सदर कामाच्या मंजुरी करीता मी उप-कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि यांना समक्ष भेटून माझ्या कामाला मंजुरी द्यावी म्हणून विनंती केली असता,

तारीख 25/8/2020 रोजी 25,000 रूपयाची माझे काम मंजुर करण्या करीता लाचेची मागणी केली.तक्रारदारांने माझ्या.कडे सद्या पैसे नसल्याने मी आपणास 28/8/2020 रोजी रक्कम आणून देतो असे सांगुन सदर तक्रारदार हा अँन्टी करप्शन ब्युरो ,ठाणे,कँम्प पालघर यांच्या कडे आपली तक्रार नोंदवली.

तक्रारदारानी आपली तक्रार नोंदवताच .एस.एस.चांदेकर पोलीस उप अधिक्षक,भारत साळूंके,पोलीस निरीक्षक. कदम,सुवारे,सुतार,सुमडा, चव्हाण,पालवे,जाधव,दोडे या सापळा पथकाने तक्रारदारा दारा कडून पंचासमक्ष 25000 रू उप कायॆकारी अभियंता-यास ,आज दिनांक 28/8/2020 रोजी 03:06 वाजता रंगेहात पकडले.हँश व्हँल्यू घेण्यात अाली असून फोटोग्राफ घेण्यात आलेले आहे. अधिक तपास सुरू आहे.

अँन्टी करप्शन अधिकारी पालघर यांनी सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की,त्यांच्या कडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्या साठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा
अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणेे,कँम्प पालघर @दुरध्वनी [email protected]मोबा.क्रं.99234699430.
@ टोल फ्रि.क्रं.1064 .या वर तात्काळ संपकॆ साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here