पं.स. ची जिर्ण इमारत नुतनीकरणाच्या प्रतिक्षेत इमारत कोसळल्यावरच शाशनाला जाग येईल काय ?

 • संतप्त पं.स. कर्मचाऱ्यांचा शाशनाला सवाल
 • महिला परिचारीका सुदैवाने बचावली
 • तब्बल पाच वर्षापासुन प्रस्ताव शाशनाकडे धुळखात
 • कर्मचारी जिव मुठीत घेवुनच बजावतात कार्य
 • इमारतीला तडे गेलेले, पावसाळ्यात जागोजागी पाणि पाझरते
  १३ पैकी १२ पं.स. इमारती बनल्या, रामटेक का नाही ?
  संतप्त पं.स. कर्मचाऱ्यांचा एकमुखी सवाल
  रामटेक -: (ता.प्र.)
 • तालुक्यातील ग्रामपंचायतीचे तथा जि.प. शाळांचे केंद्रस्थान असलेले पंचायत समीती कार्यालय हे सध्या त्या कार्यालयाच्या जिर्ण झालेल्या इमारतीवरून चर्चेचा विषय ठरत आहे. भिंतींना तडे गेलेली ही जुणी इमारत पावसाळ्यात ठिकठिकाणी पाझरत असुन ” एक्सपायरी डेट ” ओलांडलेली ही इमारत पडणार तर नाही ना या भितीने येथे कार्यरत असलेले कर्मचारी आपला जिव मुठीत घेवुन कसेबसे कार्य बजावित आहे.
 • मात्र या विषयापासुन अनभिज्ञ असलेले शाशन एखादी घटना घडल्यावरच नवीन इमारत बांधणार काय अशीच काहीशी शंका येथील कर्मचारी व्यक्त करीत आहे
  स्थानिक पं.स. ची ही जुणी इमारत पुर्णत: जिर्ण झालेली असुन निरखुन पाहीले असता इमारतीच्या भिंतींना तडे गेलेले आहे. काही ठिकाणी तर चक्क स्लॅब चे प्लॅस्टरच उखडुन पडलेले असुन आतील लोखंडी सळाखी दिसत आहेत.

पावसाळ्यामध्ये स्लॅब ठिकठिकाणी पाझरत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या विविध विभागातील आपले टेबल, खुर्ची तथा संगणक इकडे तिकडे हलवुन काम करावे लागते. पाणि पाझरण्याचे प्रमाण वाढल्यास वेळप्रसंगी काम सुद्धा थांबवावे लागत असते. विशेष म्हणजे पंचायत समिती कार्यालयामध्ये तालुक्याच्या संपुर्ण ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचा, शिक्षण विभागाचा तथा कृषी विभागाचा महत्वाचा तथा नवीन, जुणा लेखाजोखा (रेकॉर्ड) संग्रहित करून ठेवलेला असतो. तेव्हा रात्रीच्या सुमारास पावसाच्या पाण्यामुळे या लेखाजोख्याला क्षती पोहोचल्यास त्याला जबाबदार कोण असाही चिंताजणक सवाल कर्मचाऱ्यांमध्ये घुमजाव करीत आहे.

 • त्याचप्रमाणे नागपुर जिल्ह्यामध्ये एकुण १३ पंचायत समीती कार्यालये कार्यरत असुन त्यापैकी १२ चे नवीन इमारत बांधकाम करण्यात आलेले आहे मग फक्त रामटेक पं.स. कार्यालयाच्या इमारतीचाच प्रस्ताव धुळखात ठेवण्यात शाशनाचा हेतु काय असावा ? तसेच एखादी नको असलेली घटना घडल्यावर शाशन लक्ष देईल काय ? नवीन इमारत बांधकामासाठी आम्ही लेखणीबंद आंदोलन करावे काय असे नानाविध सवाल येथील कर्मचारी भिती सदृष अवस्थेमध्ये करीत आहे. तेव्हा तडे गेलेल्या भिंती व पाझरणाऱ्या स्लॅबच्या खाली धास्तीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी येथे नवीन इमारत बांधकाम करण्यास राज्य शाशन उदासीन का ? असा केवीलवाना सवाल केलेला आहे.

परिचारीका मुन मॅडम सुर्देवाने बचावल्या
पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या स्लॅबचे एका कोपऱ्यातील पोपडा अचानक खाली पडला. दरम्यान यावेळी येथे कार्यरत परिचारीका मुन मॅडम जवळच उभ्या होत्या. मात्र त्या यावेळी सुदैवाने बचावल्या. यावेळी परिचारीका मुन यांचेसह इतर कर्मचाऱ्यांनी शाशनाच्या दुर्लक्षीत धोरनाबाबद तिव्र नाराजी व्यक्त केली.
डागडुजीसाठी १० लक्ष रु. मंजुर, वर्क ऑर्डर येताच काम सुरु करू – शाखा अभियंता पाटील
याबाबद स्थानिक जि.प. बांधकाम विभाग येथील शाखा अभियंता तथा उपविभागीय अभियंता पदाचा कार्यभार असलेले श्री. गौ.रा. पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की सदर जिर्ण इमारतीच्या डागडुजीसाठी १० लक्ष रुपये मंजुर झालेले असुन वर्क ऑर्डर मिळताच आम्ही तात्काळ काम सुरु करू. सदर डागडुजी बांधकामात इमारतीची डागडुजी, डेंटिंग – पेंटींग, महीलांच्या शौचालयावर स्लॅब टाकणे आदी. कामांचा समावेश असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी माहीती देतांना सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here