घाटंजी तालुक्यातील शेतकरी रानडुकरे व वन्यजीवांच्या उच्छादामुळे त्रस्त…

सचिन येवले ,यवतमाळ

नैसर्गिक व शासननिर्मित संकटासोबतच वन्यजीवांचा उच्छाद हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. मोकाट जनावरे शेतात आली तर शेतकरी त्यांना कोंडवाड्यात नेतात. मात्र वन्यजीवांच्या बाबतीत शासनाचे असलेले धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे.

शासनाने या वन्यजीवांसाठी जंगलातच सोयाबीन, कपाशी व इतर पिकांची पेरणी करावी जेणेकरून वन्यजीव शेतात येणार नाही अशी मागणी घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. वन्यजीवांची केलेल्या नुकसानाची भरपाई घेण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे व अत्यंत तोकडी रक्कम शेतकऱ्याला दिल्या जाते.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री ना.संजयभाऊ राठोड यांनी या समस्येकडे लक्ष देऊन नुकसान भरपाईची रक्कम वाढवावी तसेच वन्यप्राणी शेतात येणार नाही याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी घाटंजी तालुक्यातील शेतकरीवर्गाकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here