Friday, April 19, 2024
Homeखेळअहेरी | मैदानी खेळांमुळे तरुणांचे शारीरिक कौशल्य विकसित होते...माजी आ.दीपकदादा आत्राम...

अहेरी | मैदानी खेळांमुळे तरुणांचे शारीरिक कौशल्य विकसित होते…माजी आ.दीपकदादा आत्राम…

Share

कमलापूर येथे ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

दादा फ्रेंड्स क्लब कडून व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन

गडचिरोली – अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे दादा फ्रेंड्स क्लब कडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष कमलापूर उपसरपंच सचिन ओलेटीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच पुरुषोत्तम येजुलवार,आविस सल्लागार शंकर रंगुवार तिरुपती किर्तीवार, ग्राप सदस्या इंदुताई पेंदाम,ग्राप सदस्या मायाताई आईलवार,नारायण दुर्गा,सतक्रती कुमारी, समय्या येजुलवार,राजन्ना पोरलावार,दादाजी अडगोपुलवार,संदिप येमुलवार,किष्ठाय्या पेंदाम,व्यंकटेश कडार्लावार,आविस सल्लागार माधव कुडमेथे,आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना व्हॉलीबॉल या मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण व्हॉलीबॉल या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार आविस सल्लागार शंकर रंगुवार व तिरुपती किर्तीवार तर तृतीय पुरस्कार ग्राम पंचायत कमलापूर यांच्याकडून ठेवण्यात आले.

कमलापूर येथील दादा फ्रेंड्स क्लब कडून आयोजित व्हॉलीबॉल सामन्याचे यशस्वीतेसाठी सुदीप रंगुवार,श्लोक आत्राम,राजू उल्लेदला,संस्कार दुर्गे,निवास चालूरकर यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जेष्ठ पत्रकार श्रीधर दुग्गीराला यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला कमलापूर गावातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होती.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: