अन्यथा आत्मक्लेश आंदोलन करणार..! भाई प्रदीप अंभोरे…

चिखली – राहुल गवई

लाँकडाऊन चा खरा लाभ कोणी घेतला असेल तर ते फक्त महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणने…! कसलीही पर्वा न करता जनतेला अर्थात ग्राहकाला अव्वाच्या सव्वा बिले देऊन जनतेची या लॉक डाऊन मध्ये पिळवणूक वीज महावितरण करीत आहे.

त्यातच आता महावितरणने ग्रामपंचायतीला सुद्धा सोडले नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या ठिकाणी सुद्धा विजेचे कनेक्शन कापण्यात आले. त्यामुळे जनतेला उन्हाचा तडाखा व पाण्याचा तुटवडा आणि घरामध्ये अंधार अशा तीन प्रकारे यातना सहन करावा लागत आहे.

आणि शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतला पंधराव्या वित्त आयोगातून महावितरण कंपनीचे वीज देयक भरण्याचे आदेश द्यावे अशी मागणी भाई प्रदीप अंभोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली.

त्यांनी निवेदनात नमूद केले की, मुस्लिम समाजात पवित्र सण मानणाऱ्या रमजान तसेच हिंदू धर्मीय सुद्धा पवित्र सण मानणाऱ्या गुढीपाडवा आणि बहुजनांचे आराध्य दैवत महात्मा ज्योतिराव फुले तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती याच महिन्यामध्ये आहे.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनी अर्थात महावितरण ने सर्व गावे प्रकाशमान करण्यासाठी आणि प्रत्येक गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी वरील कापण्यात आले विजेचे कनेक्शन त्वरित सुरू करावे अशा आशयाचे निवेदन उंद्री ( उदयनगर ) चे सरपंच भाई प्रदीप आंभोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यांनी निवेदनात स्पष्ट इशारा दिला की सदर विषयाची दखल न घेतल्यास आत्मक्लेश आंदोलन करू…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here