कोगनोळी येथील अवैद्य वाहतुकी बाबत बेळगाव जिल्हाधिकार्‍यांना दुसऱ्यांदा दिले निवेदन…

राहुल मेस्त्री

दिनांक १२ जानेवारी रोजी कोगनोळी ग्रामस्थांच्या व पत्रकार संघाच्या वतीने बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांना कोगनोळी येथील अवैद्य वाहतुकीबाबत निवेदन सादर केले होते. याबाबत अधिक माहिती अशी की पुणे-बंगलोर महामार्ग कोगनोळी नजीकच्या टोल नाक्याला बगल देऊन कोगनोळी गावातून चार चाकी ते सोळा चाकी पर्यंत हजारो वाहने दररोज जात असतात.

यामुळे गावातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व गावकऱ्यांना याचा त्रास गेले अनेक दिवस सहन करावा लागत आहे. यासाठी दिनांक 12 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन याबाबत तोडगा काढण्याचा दहा दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला होता .मात्र प्रशासनाने या निवेदनाला कचर्‍याची कुंडी दाखवली का ?असा प्रश्न कोगनोळी करांना पडला आहे.

आज दिनांक 29 जानेवारी रोजी पुन्हा एकदा कोगनोळी येथील अवैद्य वाहतुकीबाबत तोडगा काढण्याबाबत बेळगावचे जिल्हाधिकारी एम जे हिरेमठ यांना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज वीरकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुन्हा एकदा निवेदन सादर केले आहे. व या निवेदनाची दखल न घेतल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा त्यांनी याआधीच प्रसार माध्यमांना दिला आहे.

त्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासन या निवेदनाची दखल घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर येथील अवैद्य वाहतुकीचा तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखल्या नंतर निर्माण होणाऱ्या अडचणींना जबाबदार कोण? हे देखील पहाणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व येथील ग्रामस्थ यांच्यात एक बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे ही काळाची गरज आहे .अन्यथा जिल्हा प्रशासनाला कोगनोळी करांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here