तिरोडा येथे शितकालीन खेळ प्रशिक्षण शिविराचे आयोजन…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्हातील तालुका तिरोडा येथे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत स्व. मोतीलाल पटेल व स्व. गो. मो. कोलते सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ १५ व्या शितकालीन विविध खेळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया जिल्हा वुशु, आर्चरी, कराटे, किकबॉक्ससिंग, कबड्डी, आरोबिक असो. व तालुका क्रीडा समिती तिरोडा द्वारे आयोजित करण्यात आले होते.

या पाच दिवशीय शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत करून विधिवत उद्घाटन करण्यात आले होते.या वेळी मान्यवरांनी सांगितले की मागील काही वर्षां पासुन या शिबिराचे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विदयार्थ्यांनान मोठा फायदा खेळात झाला दिसुन येते.

या शिबिरात सहभागी विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक प्राप्त करत आहेत,ही जिल्ह्याकरिता गौरवाची बाब आहे.या सोबतच सैन्य व पोलीस दलात सुद्धा येथील खेळाडूंची निवड देखील झाली आहे. शिबिरात 345 प्रशिक्षनार्थी सहभागी झाले होते. तसेच शिबिरात रक्तदान कार्यक्रम देखील करण्यात आले.

या शिबिरात वुशु,आर्चरी, राईफल शुटिंग, कराटे, किकबॉक्ससिंग, तायकाडॉ, आरोबिक,योगा-प्राणायाम या खेळाचे प्रशिक्षण विशेष तज्ञा द्वारे देण्यात आले.शिबिराचे आयोजन तालुका क्रीडा समिती,तिरोडा क्रीडा संयोजक सुनील शेंडे,तालुका क्रीडा समिती चे अध्यक्ष राजेश असाटी, गुणवंत क्रीडा पुरस्कारथी संजय नागपुरे, संदीप मेश्राम, सुरेश शहारे, सुनील ठाकरे ,प्रदीप मेश्राम,दीपक घरजारे,वीकेश मेश्राम यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here