खा.राहुलजी गांधी यांच्या ५० वा वाढदिवसानिमीत्त विविध कल्याणकारी व समाजपोयोगी कार्यक्रमाचे अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आयोजन…

मा. ना. डॉ. नितीनभाऊ राऊत अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभाग यांच्या निर्देषानुसार व महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मा. विजयजी अंभोरे यांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाचे नेते मा. खा.राहुलजी गांधी यांचा 50 वा वाढदिवसानिमीत्त दिनांक 19 जुन रोजी विविध कल्याणकारी व समाजपोयोगी कार्यक्रम आयोजित करून साजरा करायचे ठरले होते.

त्यानुसार अकोला जिल्हा काॅंग्रेस कमिटी ग्रामिण व शहर अनुसूचित जाती विभागाच्या वतीने व अकोला जिल्हा काॅंग्रेस कमिटी ग्रामिण अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाकार्याध्यक्ष मा. भूषण गायकवाड व महानगराध्यक्ष मा. आकाश सिरसाट यांच्या नेतृत्वात खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

दिनांक 16 जुन, 2020 रोजी कोरोना योद्धा म्हणून बार्शिटाकळी, मुर्तिजापुर, अकोट, व अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सन्मानित केले. कारण लाॅकडाऊनच्या काळात त्यांनी पिकविलेल्या अन्नामुळे आपण जगलो म्हणून ते सुद्धा समाजातील करोना योद्धा आहेत.


तसेच दिनांक 17 जुन, 2020 ला सोशल मीडिया द्वारे मा. खा. राहुल गांधी यांनी कोरोनाच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख असलेले मेसेजेस अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आले. तसेच दिनांक 18 जुन , 2020 ला वेबिनारचे आयोजन करुन या वेबीनारमधे मा. खा. राहुलजी गांधी यांचे राष्ट्र उभारणीच्या कार्यातील योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

व दिनांक 19 जुन, 2020 ला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीरात अकोला जिल्हा युवक काॅंग्रेस ग्रामिण जिल्हाध्यक्ष मा. महेश गणगणे यांनी रक्तदान करुन रक्तदान म्हणजे जिवनदान हा संदेश युवकांना दिला. तसेच या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. ब्रम्हदेव इंगळे, प्रदेश समन्वयक तथा

अकोला जिल्हा प्रभारी मा. भाई प्रदिप अंभोरे, प्रदेश समन्वयक मा. जितेंद्र बगाटे, नगरसेवक पराग कांबळे, कपिल रावदेव, प्रदेश महासचिव एन एस यु आय आकाश कवळे, राहूल सारवान, अंकुश तायडे, महेंद्र सुतार, जिल्हाकार्याध्यक्ष मुकींदा अंजनकार, सागर शिरसाट, दिनेश वाघमारे, कोमल नवघरे, जय वानखडे, अक्षय शिरसाट, विनोद वानखडे, विकास डोंगरे, सनी शिरसाट ,

मोणू आठवले, निखील मनवर, तसेच बहूसंख्याने अनुसूचित जाती विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच दिव्यांगांना साहित्य वाटप, गरीब व होतकरू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण व कोरोना योद्धांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


वरील सर्व कार्यक्रम कोरोनाच्या परिस्थितीत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आयोजीत करण्यात आले. तसेच सोशल डिस्टंसिन्ग पाळण्यात आले. तसेच वरील सर्व आयोजीत कार्यक्रम काॅंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने व तालुकाध्यक्ष सुशिल गायकवाड, संदेश वानखडे, नितीन तेलगोटे, गौतम उमाळे, आकाश हिवराळे, वैभव तायडे यांच्या नेतृत्वात बार्शिटाकळी, मुर्तिजापुर, अकोट, अकोला तालुक्यात सुद्धा आयोजीत करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here