“धम्म विचार प्रबोधन” मालिका चे आयोजन…

जळगाव – सम्यक संबुद्ध जगाला कळले पाहिजे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली. तो दिवस म्हणजे अशोका विजया दशमी, दि. १४ ऑक्टोबर १९५६ इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात ज्या दिवसी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली होती तो दिवस बौद्ध इतिहासात अशोका विजया दशमी म्हणून साजरा केला जातो.

म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच दिवशी नागपूरमध्ये आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन बौद्ध धम्माचे चक्र गतिमान केले. त्याच दिवसाला “धम्मचक्रप्रवर्तनदिन” असे संबोधले जाते.

हे तथागतांचे मानवतावादी थोर विचार समाजापर्यंत पोचून समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या शुध्द हेतूने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म संवाद (सोशियल नेटवर्किंग ग्रुप) फुले, शाहु, आंबेडकर विचार मंच व डॉ. आंबेडकर विचारधारा अभ्यास मंडळ क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ”धम्मविचार प्रबोधन मालिका” दि. १४ ते २५ ऑक्टोबर २०२० या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर धम्मविचार प्रबोधन मालिकेमध्ये आपल्याला झुम अॅप, फेसबुक आणि यु टुब द्वारे सहभागी होता येईल. या संपूर्ण धम्म विचार प्रबोधन मालिकेच्या कार्यक्रमाची भूमिका प्रमुख आयोजक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार धारा अभ्यास मंडळ तथा संचालक भाषा अभ्यास प्रशाळा प्रा. म. सु. पगारे हे मांडतील.

ह्या कार्यक्रमासाठी क. ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील तसेच समारोपासाठी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार उपस्थित राहणार आहेत. या धम्म विचार प्रबोधन मालिकेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे असुन तरी सर्व धम्म उपासक – उपासिका, संशोधक व अभ्यासकांनी या कार्यक्रमास दिलेल्या लिंकवर जाऊन सहभागी व्हावे.

कार्यक्रमाची रूपरेषा दि. १४ ऑक्टोबर २०२० (बुधवार) वक्ते – भन्ते ज्ञानज्योती महाथेरो, (वरोरा) विषय – क्रांती आणि प्रतिक्रांती भूमिका – प्रो.डॉ. म. सु. पगारे, संचालक, भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, (जळगाव) सूत्रसंचालन -प्रा. विजय घोरपडे, डॉ.आंबेडकर विचारधारा विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, (जळगाव) आभार – ताराचंद अहीरे,

दि. १५ ऑक्टोबर २०२० (गुरुवार) वक्ते – भन्ते अश्वजित महाथेरो विषय – धम्म संस्कार वर्गाच्या माध्यमातून बौद्धमय होणारा समाज सुत्रसंचालन – प्रा.अरूण अवसरमल, इतिहास विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, (जळगाव) आभार – प्रा. सुबोध वाकोडे. डॉ.आंबेडकर विचारधारा विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, (जळगाव), दि. १६ ऑक्टोबर २०२० (शुक्रवार) वक्ते – आचार्य महानागरत्न, (नांदेड) विषय – समथ विपश्यना – एक विशुध्दीमार्ग सुत्रसंचालन -प्रा. वनश्री अशोक बैसाने,

समाजकार्य विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, (जळगाव) आभार – डॉ.मनोज इंगोले,इतिहास विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, (जळगाव), दि. १७ ऑक्टोबर २०२० (शनिवार) वक्ते – भन्ते उपगुप्त महाथेरो, (पुर्णा) विषय – विज्ञानाच्या पुढील टप्पा म्हणजेच बुद्धीझम सुत्रसंचालन – बाबूराव वाघ, (जळगाव) आभार – मनोहर बाविस्कर, दि. १९ ऑक्टोबर २०२० (सोमवार) वक्ते – भन्ते धम्मबोधी

(औरंगाबाद) विषय – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म कार्यातील विविध अनुभव सूत्रसंचालन – महेश सूर्यवंशी आभार – शंकर पगारे, दि. २० ऑक्टोबर २०२० (मंगळवार) वक्ते – भन्ते आनंद महाथेरो (मुंबई) विषय – माझ्या ५३ वर्षातील बौद्ध धम्माच्या अनुभुतीचा विकसनशील प्रवास सूत्रसंचालन – डॉ.मनोज इंगोले, इतिहास विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, (जळगाव) आभार – प्रा. दिपक खरात, भाषा अभ्य्यास प्रशाळा व संशोधन केंद्र, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ,

(जळगाव), दि. २१ ऑक्टोबर २०२० (बुधवार) वक्ते – भन्ते ज्ञानरक्षित (औरंगाबाद) विषय – निर्वाण मार्गाने प्रवास करणाऱ्या साधकाच्या प्रवासातील अडथळे सूत्रसंचालन – प्रो. डॉ. अनिल चिकाटे, संचालक- कला व मानवविद्या प्रशाळा, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ (जळगाव) आभार – प्रा. डॉ. विनोद निताळे, पत्रकारीता विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ (जळगाव), दि. २२ ऑक्टोबर २०२०

(शुक्रवार ) वक्ते – भन्ते खेमधम्मो (मूळावा) विषय – जीवन जगण्याची कला म्हणजे धम्म सूत्रसंचालन – डॉ. अनिल डोंगरे, संचालक- व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा तथा विभाग प्रमुख- डॉ.आंबेडकर विचारधारा विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, (जळगाव) आभार – उगलाल शिंदे, दि. २३ ऑक्टोबर २०२० (शनिवार ) वक्ते – भन्ते बी संघपाल (मुंबई) विषय – मनाच्या निर्मळतेसाठी धम्माचा सद्उपयोग सूत्रसंचालन – डॉ. सुधीर भाटकर. क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ

(जळगाव) आभार – सतीश शिंदे, दि. २४ ऑक्टोबर २०२० (रविवार) वक्ते – पु. धम्मदर्शना माताजी महाथेरो (औरंगाबाद) विषय – भिक्खूणी संघाचा थेरी पदाकडील प्रवास सूत्रसंचालन – प्रा.जयश्री शिंगाडे, शिक्षणशास्त्र विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ

(जळगाव) आभार – प्रा.विजय घोरपडे, डॉ.आंबेडकर विचारधारा विभाग, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ, (जळगाव), दि. २५ ऑक्टोबर २०२० (सोमवार) वक्ते – भन्ते धम्मरक्षित महाथेरो, उदना, (सूरत) विषय- पंचशील से निब्बाण तक या कार्यक्रमासाठी जिज्ञासू, चर्चक, संशोधक व अभ्यासकांनी जास्तीत जास्त संख्येने.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here