नगरसेवक प्रणित राजेंद्र सोनी यांच्या प्रयत्नातून प्रभागातील 18 ते 44 वयोगटातील युवक व नागरिकांसाठी फिरते लसीकरण केंद्राचे आयोजन

अमरावती – प्रभाग क्रमांक 13 ( अंबापेठ-गौरक्षण) चे युवा नगरसेवक व विधी समिती सभापती, प्रणित राजेंद्र सोनी यांनी प्रभागातील वय 18 ते 44 या युवा वर्गासाठी कोव्हिशिल्ड या लसीचे फिरते लसीकरण शिबिर घेतले. शिबिरात युवक व युवतींचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले. मा. महापौर श्री.चेतनजी गावंडे यांच्या संकल्पनेतून प्रथमच सुरू झालेले फिरते लसीकरण केंद्र हे म.न.पा. व प्रणित राजेंद्र सोनी यांच्या सामूहिक प्रयत्नाने सदर शिबिर दि.23/06/2021 ला 9 ते 4 वाजे पर्यंत संपन्न झाले.

मा. महापौर श्री. चेतनजी गावंडे, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष किरणजी पातुरकर, म.न.पा. पक्षनेता तुषारजी भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली व मनपा चे इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी शिबिरात उपस्थित होते. शिबिरामध्ये 200 युवक-युवतीचे लसीकरण करण्यात आले.

शिबिराकरिता आवश्यक सर्व सामग्री व कर्मचारी अमरावती महानगरपालिका यांच्याकडून उपलब्ध झाले. सदर शिबिरात लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात युवांची गर्दी झाली व काहींना लस घेतल्या शिवाय ही परत जावे लागले या करिता क्षमस्व.

शिबिर यशस्वी करण्याकरिता संजयजी चौहान, विपीन चौहान, नवीन चौहान, सतीश सेंगर, संकेत जोशी, आल्हाद गहाणकर, शुभम वैष्णव, दर्शन सोनी, महेश तापडिया, भूषण हरकुट, पियुष गुल्हाने, सुदीप पेठे, साहिल ठाकूर, आशुतोष दामले, परीक्षित तापडिया, तथागत कांबळे, करण धोटे, धवल पोपट, भरत धानोडकर, जयेश गायकवाड, सौरभ किटुकले व इतरांनी खूप प्रयत्न केले. या शिबिरात “सेल्फी पॉईंट” हे युवकांसाठी आकर्षणाचे केंद्र होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here