नांदेड – महेंद्र गायकवाड
मौजे कोसमेट येथे सात फेब्रुवारी रोजी खा. डी बी पाटील माजी महसूल राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यापूर्वी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मा. शिवाजी बोटेवाड यांनी केले.
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन श्रीफळ फोडून रिबीन कापून इस्लापुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल व किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य इस्लापूर गटाचे सूर्यकांत आंरडकर, बालाजी आलेवार भाजपा तालुका सरचिटणीस, शिवाजी घोगरे पाटील चेअरमन से. स. सा. कोसमेट , शिवराम जाधव नांदेड पोलीस पाटील संघटना उपाध्यक्ष, सरपंच प्रतिनिधी भंडारवाड कोसमेट ,नागोराव बंकलवाड उपसरपंच कोसमेट, श्रीकांत जाधव उपसरपंच प्रतिनिधी, अरुण पाटील, शेख लतीफ, रमेश बोटेवाड ओ.बी.सी. सेल. जि. सदस्य, निर्गुण पाटील राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आदींची उपस्थिती होती