यवतमाळात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटना एकवटल्या…जिल्हाधिकारी यांना हटवा…वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध संघटनेची मागणी…

सचिन येवले ,यवतमाळ

यवतमाळ जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटना एकवटल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सोडावा अशी एकमुखी मागणी करीत जिल्ह्यात आंदोलन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले त्यानंतर आरोग्य विभागाच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे देत जिल्हाधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी करीत आझाद मैदानात आंदोलन सुरू केले.

या आंदोलनाला महसूल अधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला, तहसीलदार, बीडीओ, नगर परिषद मुख्याधिकारी यांचेसह जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींनी मोर्चा काढून आंदोलन स्थळी भेट दिली. याठिकाणी जिल्हाधिकारी सिंह यांच्या वर्तणुकीबाबत निषेध नोंदविल्या गेला.

जिल्हाधिकारी तानाशाही करीत आहेत, असभ्य, अशासकीय भाषेत ते अधिकाऱ्यांना वारंवार अपमानित करतात, तोडफोडीची भाषा वापरून कायद्याचा धाक दाखवून निलंबित करण्याची धमकी देतात त्यामुळं यापुढं त्यांची ही बिहारी पद्धतीची भाषा चालणार नाही, त्यांची बदली होईस्तोवर आंदोलन सुरू राहील, जिल्हाधिकाऱ्यांनी आता हा जिल्हा सोडावा अशी मागणी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here