पातुर पंचायत समितीच्या मासिक सभेत चिखलात गेलेल्या रस्त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश…

पातुर तालुका प्रतिनिधी
तीन महिन्याच्या अवधीनंतर प्रथमच पातुर पंचायत समितीच्या मासिक मिटिंग मध्ये विविध मुद्द्यांवर गरमागरम चर्चा झाली त्यात प्रामुख्याने रस्ते गेले चिखलात या वृत्ताचे पडसाद उमटले सुमारे सात तास चाललेल्या मासिक सभेमध्ये पंचायत समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर ती वचक नसल्याचा आरोप करण्यात आला.


पातुर तालुक्यातील 94 गावातील एमआरजीएस अंतर्गत करण्यात आलेले शेत रस्ते पहिल्याच पावसात चिखलात गेले त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत पेरणी करण्याच्या संबंधीच्या अडचणीत वाढ झाली क्षेत्रास त्यांच्या अवस्थेचा अहवाल सादर करण्याचा आदेश गट विकास अधिकारी विनोद शिंदे यांना गटनेते तथा पंचायत समिती सदस्य अजय ढोणे यांनी दिला.


बांधकाम विभागाकडून दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी करण्यात आले त्याबरोबरच महिला बाल प्रकल्प विकास अधिकारी यांनी महिला बालकल्याण योजना सदस्यांना विश्वासात न घेता वाटल्यामुळे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली, शिरला आणि गावंडगाव येथील सभागृहाची माहिती असल्याचा आरोप करण्यात आला आलेगाव ग्रामपंचायत चौकशी करण्याचा आधीच देण्यात आला.

तालुक्यातील पाचवी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश आणि कुत्रा चावल्यावर लागणारी लस उपलब्ध ठेवण्याची आदेश देण्यात आले तिरंगा येथील रमाई आवास योजनेचे घरकुल सरपंच यांना विश्वासात न घेता याद्या मंजुर केल्यामुळे त्या रद्द करण्याचे आदेश सभेने दिले तेथील रमाई योजनेअंतर्गत ची घरे नव्याने यादी तयार करून मंजूर करण्यात करण्याचे आदेश दिले

पाच वर्षावर अधिक मुख्यालय असलेल्या सर्व ग्रामसेवकांच्या तातडीने बदल्या कराव्यात त्याबरोबरच ग्रामसेवकांना दिली जाणारी अतिरिक्त गाव मुख्यालय शेजारीच असावी असा ठराव पारित करण्यात आला,

ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर नानासाहेब नगर समर्थ नगर येथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार कराव्या त्याबरोबरच शिरूर येथील वीज पुरवठा करणाऱ्या तारा जुन्या झाल्या आहेत त्या नव्या टाकण्यात याव्या असा ठराव शिर्ला पंचायत समिती सदस्य अजय ढोणे यांनी मांडला


पंचायत समितीच्या सेस फंडातून सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी लोखंडी डवरे ९०% अनुदानावर पुरवण्याची कथा समाज कल्याण विभाग अंतर्गत मागासवर्गीयांना शिलाई मशिन पुरवण्याची योजना मंजूर करण्यात आली त्याबरोबरच तालुक्यातील मागासवर्गीय पायाने अपंग असणाऱ्या ना तीन चाकी सायकल करण्याचा ठराव पारित करण्यात आला त्याबरोबरच कोरोणा चा ग्रामीण भागात वाढत असलेला प्रकोप कमी करण्यासाठी गावागावात वाहनावरून भुंगा लावून जनजागृती करावी असा ठराव सुनिता अर्जुन टप्पे त्यांनी मांडला. विवरा पिंपळकोठा रस्त्यावर फॅक्टरी गावाजवळील रोडवर नाल्यावर पाईप टाकण्याचे आदेश देण्यात आले


सभेमध्ये 11 मार्च रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम कायम करण्यात आले मार्च 2020 मी 2020 चा जमा खर्च मंजूर करण्यात आला सन 2019 चा वार्षिक प्रशासन अहवाल अस मंजुरी देण्यात आली पंचायत समितीच्या सेस फंडातील योजनांना मंजुरी देण्यात आली


सुमारे पाच तास पातुर पंचायत समितीच्या बचत भवन मध्ये झालेल्या मासिक सभेत अधिकारी-कर्मचारी यांच्या वेळ काढून धोरणावर ताशेरे ओढण्यात आलेत त्याबरोबरच पुढील कालावधीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले या सभेचे कामकाज सभापती लक्ष्मीबाई जनार्धन डाखोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला गटनेते अजय ढोणे विरोधी पक्षनेत्या सुनिता अर्जुन टप्पे आणि अर्चना डाबेराव यांनी प्रश्नांची सरबत्ती केली सभेला बारापैकी अकरा सदस्य उपस्थित होते सचिव म्हणून गटविकास अधिकारी विनोद शिंदे यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here