करवीर औद्योगिक वसाहतीच्या भू संपादनास विरोध…

कोल्हापूर प्रतिनिधी – राजेद्र ढाले

हलसवडे ता (करवीर )करवीर औद्योगिक वसहाती करता पाहणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यास नेरली विकासवाडी हल् सवडे येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला

हलसवडे नेरली विकास वाडी कणेरीवाडी या गावातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीस व पंचतारांकित औद्योगिक वसाहत याला जोडणारी करवीर औद्योगिक वसाहत निर्माण करण्याची काम शासन स्तरावर सुरू असून दोन हजार नऊ दहा सालापासून त्यात वारंवार शेतकऱ्यांनी विरोध करत निवेदन देऊन हरकती नोंदवून सुद्धा शासनाने जमीन्औद्योगिक विकासासाठी असा शिक्का पडला आहे.

त्यामुळे शेतकरी नाराज आहेत तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नसल्याची शेतकऱ्यांनी ठामपणे सांगितले आज आलेल्या अधिकाऱ्यांनी तुमच्या भावना आम्हाला कशा समजणार चर्चेतून मार्ग निघेल असे सांगितले मात्र शेतकऱ्यांनी आपल्या गट नंबर मध्ये थांबून काही शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना भेटून जमीन देणार नाही असा ठाम पवित्रा घेतल्याने अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलवतो असे सांगत काढता पाय घेतला.

यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राहुल शिंगारे उप अभियंता आय ए नाईक भूसंपादन अधिकारी सुशेन खापरे हलसवडे सरपंच शिला पाटील उपसरपंच मोहन खोचगे गोकुळचे संचालक व लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील एडवोकेट अनिल पाटील तानाजी पाटील महेश स्वामी रविंद्र कांबळे दलित मित्र जनार्दन पवार जय गोंडा पाटील पोपट पुजारी बाळासो पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here