विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे प्रत्युत्तर…

सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे,

असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
इंधन दरवाढीवरून अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर पटोले यांनी निशाणा साधल्यानंतर त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्याला नाना पटोले यांनी उत्तर दिले.

पटोले पुढे म्हणाले की, एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का?… ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? असा प्रश्न त्यांनी विचारला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here