स्पोर्ट्स कोट्यातील उमेदवारांना संधी…महाराष्ट्र सर्कलमध्ये २५७ पोस्टमनसह पोस्टल असिस्टंट आणि MTS या पदांसाठी भरती…

फोटो - सौजन्य गुगल

इंडिया पोस्टने महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टमन, पोस्टल असिस्टंट, शॉर्टिंग असिस्टंट आणि MTS या 257 पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. भारतीय पोस्टची ही भरती क्रीडा कोट्यातील उमेदवारांसाठी आहे.

इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा पोस्टमन भरती 2021 महाराष्ट्रासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून उमेदवार 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. dopsportsrecruitment.in वर अर्ज करता येतील.

एकूण 257 रिक्त पदांपैकी 93 पदे पोस्टल सहाय्यक, 9 शॉर्टनिंग असिस्टंट, 113 पोस्टमन आणि 42 MTA साठी आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना संपूर्ण भरती अधिसूचना तपासण्यासाठी या अधिकृत वेबसाईटवर जा…India Post Recruitment 2021 Notification

महत्त्वाच्या तारखा:
भरती अधिसूचना प्रकाशन तारीख – 28 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – 28 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021

एकूण रिक्त पदे – 257

पगार: पोस्टल असिस्टंट/ शॉर्टनिंग असिस्टंट – रु. 25500 ते रु. 81100, पोस्टमन -21700 ते 69100 देय इतर भत्ते व्यतिरिक्त.

वयोमर्यादा:- पोस्टल असिस्टंट/पोस्टमनसाठी 18 ते 27 वर्षे आणि MTS साठी 18 ते 25 वर्षे.

अर्ज फी – 200 रु.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here