वाघाला वाचविण्यासाठीच गवताच्या कुरणाची गरज, वाघाचे खाद्य जगले तरच वाघही जगेल…

रामटेक – राजु कापसे

नजीकच्या पेंच राष्ट्रीय उद्यानात गवताच्या कुरणावर भर दिला जात आहे याचे मुख्य कारण म्हणजे वाघाचे खाद्य वाचविण्याकरिता जंगलातील हरीण, सांभर, निलगाय, रानडुक्कर यासारखे प्राणी वाचने व त्यात वाढ होणे गरजेचे आहे.ते जगले तरच वाघ शिकार करुन त्याला जगता येईल त्यामुळे येथे गवताच्या कुरणावर भर दिला जात आहे.
१९९५ मध्ये पेंच राष्ट्रीय उद्यानाला मंजूरी मिळाल्या त्यावेळी येथे तोतलाडोह नावाचे एक मोठे गाव होते.

१९७२ पासुन येथे मेघदुत जलाशय उभारण्यास सुरुवात झाली तेव्हापासुन येथे मजूरांपासुन तर ठेकेदार येथे वास्तव्यास होते.२००१ मध्ये गावाचे स्तलांतरण करण्यात आले तेव्हापासुन येथे सिंचन व मध्यप्रदेश विद्युत मंडळाच्या शंभरावर ईमारती येथे होत्या.

त्या सर्व ईमारती निर्लेखीत करण्यात आल्या व येथे गेल्या वर्षी पासुन मोठमोठे भुखंड तयार करुन त्यावर जंगली प्राण्यांच्या खाद्यासाठी जमीन सुपीक करुन गवताचे कुरण लावण्यात आले.संद्या हे कुरण प्राण्यासाठी मोकळे करण्यात आले नाही याचे कारण त्या गवताची वाढ होवुन त्याच्या बिया तयार व्हाव्यात व त्या जमीनीत पडुन त्यातुनच दरवर्षी तेथे नैसर्गीकरित्या गवताची उत्पत्ती व्हावी हा उद्देश आहे.

त्याचप्रमाणे तेथे काही भुखंडावर वेगवेगळ्या १८ प्रजातीचे झाडे लावण्यात आले एक बाय एक मिटरच्या जागेत ३ झाडे इतकी घनदाट झाडे लावण्यात आली असुन ती झाडे १४ महिण्यात १० ते १२ फुट उंचीची झाली सदर झाडे ही जपानी पद्धतीने लावण्यात आल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांनी दिली.ही झाडे प्रती हेक्टर ३० हजार याप्रमाणे दिड हेक्टर मध्ये ४५ झाडे लावण्यात आली.त्या ठिकाणी वाघ सुद्धा आपले वास्तव्य करु शकतो या पद्धतीने लावण्यात आले आहे.एकंदरीत वाघांची सख्या वाढावी व त्यांना दिर्घायुष्य जगता यावे हाच यामागचा उद्धेश असावा असे दिसुन येते.

व्याघ्र दर्शन झाले तरच पर्यटक वाढणार
येथे पर्यटक संद्याही मोठ्या प्रमाणात येत आहेत परंतू काहिंना व्याघ्र दर्शन होते ते अगदी खुश होतात परंतू काहींना दर्शन न झाल्याने ते निराश सुद्धा होतात त्यामुळे काही ठरावीक भागात वाघोबा आपले ठाण मांडतील अशी तयारी देखील यामाध्यमातून गरणे गरजेचे आहे.असे यावरुन दिसुन येते.जर व्याघ्र दर्शन झाले तरच येथे पर्यटक वाढतील असे बोलल्या जाते व तशी तयारी देखील वनविभागाची दिसुन येते.

वाघांना जगविण्याकरिता इतर प्राण्याची तितकीच गरज
वाघाचे दर्शन व्हावे हे प्रत्येक पर्यटकांना वाटते पेंच मध्ये वाघांची संख्या बरीच असली तरी प्रत्येकाला व्याघ्र दर्शन होने शक्य होत नाही.पूर्व पेंच मध्ये बराचसा विकास झालाअसला तरी आता बरेच विकास कार्य करायचे आहे व ते सुरु आहे.वाघांना जगविण्याकरिता व त्याच्या शिकारी करिता ईतर प्राणीही जगणे महत्वाचे असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवताचे कुरण व ईतर झाडांची लागवड करण्यात आली आहे.तसेच काही ठिकाणी प्रती १चौरस मिटर ३ याप्रमाणे दीड हक्टर मध्ये ४५ हजार झाडाची लागवड जपानी पद्धतीने करण्यात आली आहे. मंगेश ताटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पूर्व पेंच,पिपरिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here