नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीसच्या वतीने न्याय मिळविण्यासाठी “क्वेस्ट फॉर जस्टिस” या पुस्तकाचे दिल्लीतून ऑनलाईन प्रकाशन…

अहमदपूर – बालाजी तोरणे

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टी(NDMJ) एन.सी.डी.एच.आर. व अॅट्राॅसिटी कायदा सशक्तीकरण राष्ट्रिय महासंघ या संस्थेच्या वतीने “आस न्यायाची”, “क्वेस्ट फॉर जस्टीस ” या इंग्रजी अहवालरूपी पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाइन झूमॲप द्वारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी.जी बालकृष्णन साहेब तसेच नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीजचे राष्ट्रीय महासचिव डॉ.रमेशजी नाथन,

नेपाळचे खासदार मिनी विश्वकर्मा,विद्यापीठ अनुदानआयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक सुखदेव थोरात, अशीया फोरमचे अध्यक्ष पॉल दिवाकर,भारतीय दलित अभ्यास संस्था छत्तीसगडचे सुश्री ममता कुजूर,

तामिळनाडू पीपल्स वॉच चे कार्यकारी संचालक दलित आर्थिक आंदोलन सरचिटणीस बिना पॉल्पिकल,ॲड.राहुल सिंग, नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्रचे महासचिव अॅड.केवल उके, तसेच अनेक मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत “क्वेस्ट फॉर जस्टीस”अहवाल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

हा अहवाल दलित आणि आदिवासी यांच्याविरुद्धच्या हिंसाचाराचे स्वरूप आणि त्याचे प्रमाण व विश्लेषण यावर आधारित आहे. यामध्ये गेल्या दहा वर्षात अत्याचाराची एकंदर अंमलबजावणी कशी केली गेली हे सादर केले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश नाथन यांनी केले.

मा.न्यायमुर्ती बी.जी बालकृष्णन यांनी क्वेस्ट फॉर जस्टीस हवालाा बद्दल एन.डी.एम.जे व एन.सी.डी.एच.आर.चे कौतुक केले तसेच ते म्हणाले की या कायद्याचा कसाउपयोग केला जातो?.ॲट्रॉसिटी कायदा मध्येेे शिक्षेचे प्रमाण खूूपच कमी आहे याचे कारण तक्रारदार व साक्षीदार यांच्यावर दबाव आणला जातो. गुन्हेगारी,न्यायालयीन प्रशासकीय यंत्रणा गंभीरपणे दखल घेत नाही. ती अपयशी ठरत आहे.

यावर एफ.आय.आर.दाखल करायला हवा पिडीतांवर पोलीस काउंटर गुन्हे दाखल करतात दुर्लक्ष,कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकार्‍यांंवर गुन्हे दाखल करावेत. न्यायालया मधील प्रकरणांची लढाई वाढत आहे.तसेच या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.तसेच नेपाळ चे खासदार मिनी विश्वकर्मा, डॉ.रमेश नाथन,डॉ.पॉल दिवाकर,ॲड.राहुल सिंग अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्तत केले.

या कार्यक्रमास ऑनलाइन झूम ॲप द्वारे नेपाळ तसेच भारतातून महाराष्ट्र,तमिळनाडू ,दिल्ली,बिहार,राजस्थान,छत्तीसगड,मध्यप्रदेश,अनेक राज्यांतून एन.डी.एम.जे.पदाधिकारी मोठ्या संख्येनेेे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here