हरभरा कीड रोग व्यवस्थापणावर शेतकर्‍यांना ऑनलाइन मार्गदर्शन…

मुर्तिजापुर प्रतिनीधी-

हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जानारे महत्वाचे कडधान्य आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात कमी होण्याचे मुख्य करणे हरभाऱ्याला होणारे बुरशीचे रोग आणि त्याला लागणारी किड आहे त्यामुळे हरभरा वाढिच्या वेळेला मर, मानकुजव्या, मुळकुज सारखे रोग आणि घाटे आळी सारख्या किडी चे लंक्षणे ओळखून नियंत्रण करने फार गरजेचे आहे.आणि याच अनुषंगाने कृषि विज्ञान केंद्र ,अकोला आणि रिलायन्स फाऊंडेशन यांनी संयुक्त रित्या मल्टी लोकेशन ऑडिओ कोंफेरन्स चे आयोजन दि.21 जानेवारी रोजी केले होते

.या कार्यक्रमकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषि विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ चारुदत्त ठिपसे तसेच डॉ कुलदीप देशमुख साहेब हे होते . मार्गदर्शन करताना डॉ. ठिपसे म्हनाले की सध्याच्या अवस्थे मध्ये घाटे आळी,देठ कुरतडणारी अळी, उंट अळी एत्यादी आळींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्या करिता शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे

असे त्यांनी संगीतले , घाटेआळीच्या नियंत्रणाकरिता प्रतिहेक्टर 5-6 कामगंध सापळे उभारने.अळी खानाऱ्या पक्षी ला थाबन्यासाठी टी आकाराचा पक्षी थांबा तयार करावे.अळी ची सुर्वातिच्या अवस्थात दिसल्यास 5 टक्के निबोंकीवर आधारित किटकनाशक 1 टक्के साबनाचे द्रावण मिसळून फवारणी करणे.जैविक किड नियंत्रण एन पी व्हि या विषाणूचा वापर करावा .

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे तसेच कार्यक्रम सहाय्यक अभिषेक सोरते यांनी केले होते .या कार्यक्रमात जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन आपले प्रश्न विचारले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here