ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ऑनलाईन आजी – आजोबा मेळावा संपन्न…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 1 आक्टोबर जेष्ट नागरिक दिनानिमित्त आजी-आजोबांचे ऑनलाइन मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी करकनाळे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थासचिव प्राचार्या रेखाताई तरडे-हाके,प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.अर्चना काबरा तसेच इनरव्हील क्लबच्या सचिव डॉ. भाग्यश्री यलमटे, कलावती भातांब्रे,प्रेमा वतनी,सुरेखा उगिले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे सह विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद व इनरव्हील क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.

यावेळी डॉ. अर्चना काबरा- मुंदडा यांचे जालना येथून ऑनलाइन मार्गदर्शन झाले त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड सारख्या संसर्गजन्य आजाराच्या काळात घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी बहुसंख्य आजी-आजोबांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्पर्धेत सहभाग नोंदवून आजी- आजोबा यांची मुलाखत घेतली.आणि मिली फोटो डेकोरेशन तसेच आजी-आजोबा यांच्याविषयी स्वरचित काव्यलेखन करून बक्षीस प्राप्त केले आहेत.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप व आभार डॉ.मीनाक्षी करकनाळे यांनी मानले.

यावेळी डॉ.अंजली स्वामी,अनिता जाजू, मीना भुतडा,आरती गादेवार,विनया देशमुख,ज्योती जाधव,शिल्पा हंगरगे, केंद्रप्रमुख उमाकांत कोनाले सह मोठ्या संख्येने आजी-आजोबा उपस्थित होते.या ऑनलाईन कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here