ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण ठरतेय कुचकामी…ग्रामीण परिसरातील स्मार्टफोन नसल्याने गोरगरीब विद्यार्थ्यां वंचित

अमोल साबळे

अकोला : मुलांच्या हातात अजिबात मोबाईल देऊ नका असा पालकांना गुरुमंत्र देणारे शिक्षक आता स्मार्टफोन वापरण्याचा आग्रह पालकांकडे धरताना दिसत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही व्हाट्सअप ग्रुप वर शिक्षकांचा प्रारंभ झाला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात नेटची समस्या असल्याने ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा फज्जा उडाला आहे. कोरोना संकटामुळे साडेतीन महिन्यापासून जनजीवन ठप्प होते. आता शिक्षणाची गरज लक्षात घेऊन शिक्षण विभागाने ऑनलाइन उतारा शोधून काढला आहे.


शहरी भागात बरोबर ग्रामीण भागात व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी याद्वारे शिक्षणाचे धडे देण्याचे काम सुरू आहे. हा पर्याय शहरी विभागात लागू पडत असला तरी ग्रामीण विभागात तो स्पेशल अपयशी ठरल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर अशी विद्यार्थी व पालकांची समस्या झाली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी शाळा महाविद्यालय क्लासेस इत्यादींनी ऑनलाइन शिक्षकांचा पर्याय स्वीकारला आहे.

या पर्यायासाठी स्मार्ट फोनची गरज आहे. ग्रामीण परिसरातील पालकांना फटक्या खिशातून हे कठीण आर्थिक परिस्थिती पार पडावे लागणार आहे. पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर धावून पैसे आणून स्मार्टफोन खरेदी करीत आहेत. न पडवणारा मोबाईल घरात आला तरी ग्रामीण परिसरात रेंज समस्या कायम आहे.

वारंवार वीज पुरवठा खंडित शिवाय एकाच कंपनीच्या मोबाईल टॉवरवर अनेक कंपन्यांचे थाटलेले आणि क्षमतेपेक्षा अधिकची कनेक्शन यामुळे रेंज मिळत नाही. याशिवाय अनेक ॲप व भरसाठ विद्यार्थी संख्या यामुळे ऑनलाइन शिक्षणाची वाट लागली आहे. ग्रामीण परिसरात अपुऱ्या सुविधा आणि रेंज यामुळे मोबाईल ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा ग्रामीण भागात फज्जा उडाला आहे. अशा पद्धतीने मुलाची प्रगती होणार की अधोगती यासह पालकांचीही आर्थिक कोंडी याचा विचार देखील गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here