हृदयद्रावक | एक वर्षाची मुलगी आपल्या आईच्या मृतदेहाजवळ दोन दिवस उपाशीपोटी होती…

न्यूज डेस्क :- महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह घरात दोन दिवस पडून होता. महिलेच्या मृतदेहा शेजारी तीची एक वर्षाची मुलगीही दोन दिवस तहानलेली अन उपाशीपोटी होती, पण कोणीही तिच्या मदतीला आले नाही. अखेर शुक्रवारी दोन महिला कॉन्स्टेबलने मुलीला आपल्यासोबत पोलिस ठाण्यात आणले.

ही घटना पिंपरी चिंचवडच्या दिघी भागातील आहे. उत्तर प्रदेशमधील एक महिला पती आणि मुलीसह भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वी तिचा नवरा काही कामासाठी यूपीला गेला होता आणि तो आजारी पडला होता. यानंतर ही महिला येथे आपल्या मुलीसह एकटी राहत होती. अशी माहिती आहे की तीचा मृत्यू मंगळवार किंवा बुधवारी झाला असावा. यानंतर दोन दिवस कुणालाही याचा सुगावा लागला नाही. दोन दिवसांनंतर गुरुवारी, शेजार्‍यांना दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला, परंतु कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही सदनिकेत प्रवेश करण्यास तयार नव्हते.

शुक्रवारी कुणीतरी पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली. यानंतर कॉन्स्टेबल सुशीला गभाले आणि रेखा वाजे घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा तोडून आत गेले आणि त्यांना अचानक धक्काच बसला. एक वर्षाची मुलगी मृतदेहाजवळ पडली होती आणि तिला भूक लागली होती. यानंतर दोन्ही हवालदार मुलीसह पोलिस ठाण्यात आले आणि महिलेचा मृतदेह रुग्णालयात पाठवला.

कॉन्स्टेबल सुशीला गाभले म्हणाल्या की, मुलीची प्रकृती सतत गंभीर होत जात होती आणि आणखी काही तास लागले असते तर कदाचित काही विपरीत घटना घडली असती,आम्ही आधी मुलीला दूध आणि बिस्किटे खाऊ घातले आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थोडी सिरप दिली. सध्या तीच्या वडिलांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत तो पुण्यात पोहोचेल आणि मुलीला त्याच्या ताब्यात देण्यात येईल.

दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले की बाल कल्याण समितीच्या सूचनेनुसार मुलीला शासकीय बाल देखभाल गृहात पाठविण्यात आले आहे. मुलीच्या आईचे नाव सरस्वती राजेश कुमार (वय 29) आहे. तीच्या मृत्यूमागील कारण शोधले जात आहे. सदर महिलेचा मृतदेह सापडल्याच्या दोन दिवसांपूर्वीच तीचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टममधून समोर आले आहे.

मोहन शिंदे म्हणाले की आम्ही मृत महिलेच्या शेजार्‍यांकडून मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. कोरोनाच्या भीतीने कोणीही बाळाला स्पर्श केला नाही. त्यानंतर दोन महिला हवालदारांनी बाळ मुलीला ताब्यात घेतले आणि त्यांना खायला घातले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here