पातुर भंडारज येथे एकास लुटले…

पातुर – पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या भंडारज फाट्याजवळ दोन अज्ञात इसमांनी मळसूर येथील विलास यशवंत काळे वय 42 यांना 100000 रुपयांनी लुटल्याची घटना 26 मार्च 2019 रोजी साडेआठ वाजता घडल्याचे फिर्याद 27 मार्च 2021 रोजी देण्यात आली आहे.

विलास यशवंत काळे वय 42 वर्ष राहणार मळसुर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्री काळे अकोला येथून हरभरा विक्री करून एक लाख रुपयांची रक्कम घेऊन पातुर कडे परत येत असताना रस्त्यात संम्यक जिनिंग-प्रेसिंग काही अंतरावर असताना फिर्यादीच्या मोटरसायकल मधील पेट्रोल संपले.

तेव्हा समोरून येणाऱ्या मोटर सायकल वरील दोघा जणांना मदत मागितली हे दोघेजण व फिर्यादी असे मिळून तिघेजण फुलारी पेट्रोल पंप येथे पेट्रोल येण्यासाठी आले पेट्रोल घेऊन परत जाताना फिर्यादी जवळील रक्कम असल्याचे लक्षात येतात मदत करणाऱ्या अज्ञात या दोघा जणांनी श्री काळे यांना चाकू लावून एक लाख रुपये लुटले.

फिर्यादी विलास यशवंत काळे राहणार मळसुर यांच्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक 152 / 21 कलम 392 ,34 नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पि आय हरीश गवळी पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here