जबरी चोरी करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक…

सांगली – ज्योती मोरे

फोन लावण्याचा बहाण्याने मोबाईल फोन मागून घेऊन तो घेऊन पळून जाणाऱ्या व लोकांना निर्जन स्थळी अडवून त्यांच्याकडून मोबाईल काढून घेऊन पसार होणार्‍या, इम्रान अल्लाबक्ष शेख राहणार डी मार्ट मागे सांगली. यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोबाईल विक्री करत असताना संशय आल्याने, ताब्यात घेतले आहे.

चौकशीअंती त्याच्याकडून रेडमी कंपनीचा एक आणि विवो कंपनीचा एक असे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदर मोबाईल हे काळ्या खणीजवळ एका इसमाला अडवून त्यांच्याकडून काढून घेतल्याचे व दुसरा मोबाईल चंदूकाका सराफ या दुकानासमोर एका माणसा कडून फोन लावण्याचा भाड्याने घेऊन पसार झाल्याचे इम्रान यांने सांगितले आहे.

याबाबतचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आली.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, संदीप गुरव, संदीप पाटील, राहुल जाधव, अनिल कोळेकर, संतोष गळवे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here