लोधीटोला पुलियाजवळ टिप्पर व मोटारसायकल धडकेत एक ठार तर १ जखमी…

फोटो - सांकेतिक

गोंदिया – अमरदिप बडगे

तिरोडा पोलिस स्टेशन अंतर्गत 2 डिंसेबरच्या रात्रीच्या वेळी तिरोडा मार्गावर टीप्पर व मोटारसायकल धडकेत एक युवक ठार तर एक जखमी झाल्याची दुदैवी घटना लोधीटाला पुलिया जवळ घडली आहे.

तक्रारदार शैलेश उके राहणार नवेझरी यांच्या दिलेल्या पोलिस तक्रारीनुसार नवेझरीवरुन मित्र निलेश वसंता वाढवे वय 28 वर्षे सोबत महाल्पे भाऊ मदन महादेव उके यांची मोटारसायकल क्रमांक MH35-AE3059 ने डबल सीट कुंभारे लान जवळ विदेशात जाण्यासाठी मुलाखतीला आले होते.मुलाखत आटोपून व उतर कामे करून दोघेही 8 वाजताच्या सुमारास नवेझरीला जाण्याकरिता निघाले असता,

तिरोडा वरून 2 किलोमीटर अंतरावरील लोधीटोला पुलिया जवळ तुमसर कडून येणाया टिप्पर मोटारसायकल आपल्या बाजूने असल्यानंतर ही टिप्परच्या लाईट डोळ्यावर पडल्याने ने टिप्पर चालकाने धडक दिली.त्यात मोटारसायकल स्वार दोन्ही व्यक्ती पडले.

अज्ञात टिप्पर चालक पळुन गेला.त्यात मदन महादेव उके जखमी झाला असून त्याचा सोबती निलेश वाढवेला गंभीर जखम झाल्याने नवेझरी गावातील सरपंच महेन्द्र भांडारकर यांच्या कारने व इतर सहकारी मदतीने उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान दुदैवाने निलेशचा मृत्यू झाला.तिरोडा पोलिसात अज्ञात टिप्पर चालक विरूद्ध कलम 279, 338, 304(अ) भादवी अन्वये गुन्हा नोंद केलेला असुन पुढील तपास दुलिंचंद बरवेया करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here